पूनम पांडे
मुंबई, 11 मार्च: बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्ड लूक आणि न्यूड फोटोशूटमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री डान्सर म्हणजे पूनम पांडे. तिने आजवर अनेक वादग्रस्त सोशल मीडिया पोस्ट करत अनेक विवाद निर्माण केले आहेत. पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती पूनम पांडे 2011 मध्ये केलेल्या ट्विटची. पूनम पांडे 2011 मध्ये पहिल्यांदा प्रकाशझोतात आली, जेव्हा तिने भारतात चालू असलेल्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान ‘जर भारताने विश्वचषक जिंकला तर ती तिचे कपडे काढून टाकेल’ असे विधान केले होते. पण त्यानंतर तिच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय होती याविषयी अभिनेत्रीने आता खुलासा केला आहे. पूनम पांडे आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया अभिनेत्रीच्या आयुष्यातील ‘तो’ प्रसंग. पूनम पांडेच्या वाढदिवशी तिची एक मुलाखत व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने विश्वचषक वादाबद्दल पहिल्यांदा मौन सोडलं आहे. पूनम पांडे 2011 मध्ये पहिल्यांदा प्रकाशझोतात आली, जेव्हा तिने भारतात चालू असलेल्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान आपल्या देशाने विश्वचषक जिंकला तर ती तिचे कपडे काढून टाकेल असं वादग्रस्त विधान केलं होतं. आता पूनम पांडेने हे विधान का केले ते सांगितले आहे. पूनम पांडेने ‘रेडिओ मिर्ची’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे. Vidya Balan: ‘त्याने मला खोलीत बोलावलं अन्…’ विद्या बालनने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव रेडिओ मिर्चीशी बोलताना पूनम पांडे म्हणाली, ‘मी तेव्हा १८ वर्षांची होते आणि विचार करत होते की आयुष्यात काय करावं? काहीतरी मोठे करण्याची इच्छा होती. मी क्रिकेट चालू असलेलं पाहिलं. तेव्हा मनात विचार आला ‘पूनम, तुला क्रिकेटचे ज्ञान आहे का, अजिबात नाही. क्रिकेटपटूंची नावे माहीत आहेत का? नाही. मग हा गेम चालू असताना असं काहीतरी करू ज्याने भारतात खळबळ माजेल. असा विचार करून मी ते विधान केले आणि भारत जिंकला.’’ असं ती म्हणाली.
पूनम पांडे तिच्या बोल्ड फोटोशूटविषयी बोलताना म्हणाली कि, ‘मी याबद्दल कधीही बोलले नाही, मला कोणीही ओळखत नाही, प्रत्येकाला माहित आहे की ही तीच आहे जिला नेहमीच तिचे शरीर दाखवायला आवडते. मी असं केलं कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी तिथे कसे जाऊ हा एकच पर्याय माझ्या मनात आला. मी ही संधी साधली कारण मला इतरांसारखी तडजोड करायची नव्हती.’ असा खुलासा तिने केला आहे.
आज पूनम पांडेला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी तिला ट्रोल करणारेही अनेक जण आहेत. पण ती या सगळ्याकडे दुर्लक्ष करत तिला पटतं तेच करते.