पठाण
मुंबई, 22 जानेवारी: शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांना खूप आवडली आहेत. आता ते चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. चित्रपटात दीपिका, शाहरुख आणि जॉनचे दमदार खतरनाक स्टंट पाहायला मिळणार आहेत. पण बेशरम रंग या गाण्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पठाण चित्रपटातील स्टार्स आता प्रमोशनमध्ये कमी उत्साह दाखवत आहेत. शाहरुख खान बहुतेक चित्रपटांच्या प्रमोशन दरम्यान कपिल शर्माच्या शोमध्ये जात असे पण आता यावेळी त्याने तसे केले नाही. आता त्याचे कारण समोर आले आहे. शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट रिलीज होण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाच्या निर्मात्यांना चांगल्या कमाईची अपेक्षा आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये शाहरुख आपल्या पठाणचे प्रमोशन करणार नाही. याबाबतची माहिती शाहरुख खानने ट्विट करून दिली आहे. हेही वाचा - ‘माझी तुझी रेशीमगाठ’चा दुसरा सीजन लवकरच येणार भेटीला? श्रेयस तळपदेने दिली मोठी हिंट खरे तर एका चाहत्याने शाहरुख खानला ट्विटरवर विचारले होते की, ‘सर यावेळी कपिल शर्माच्या शोमध्ये येत नाही का?’ या प्रश्नाचे उत्तर खुद्द शाहरुख खानने ट्विट केले आहे. शाहरुख खानने ट्विटला उत्तर देत म्हटले की, ‘भाई, मी थेट चित्रपटगृहात येईन, तिथे भेटू.’
शाहरुख खान बऱ्याच दिवसांनी पडद्यावर परतत आहे. याआधी शाहरुख खानचा झिरो हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. गाणे रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता. मात्र, बेशरम रंग या गाण्याला वादांचा फायदा मिळाला आणि ते हिट ठरले. पठाणमध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.
पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे रिलीज झाल्यापासूनच वादात सापडले आहे. तो प्रदर्शित होताच सोशल मीडियावर याला झपाट्याने विरोध होताना दिसत आहे. ट्विटरवर चित्रपटाबद्दल हॅशटॅग सुरूच होते. चित्रपटाबाबत अनेकवेळा राजकीय वक्तृत्वही पाहायला मिळाले. गाण्यातील दीपिकाच्या बिकिनीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, आता रिलीजपूर्वी हे प्रकरण थंडावले आहे. हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होत आहे. आता पठाणला प्रेक्षकांची पसंती मिळते की नाही हे पाहावे लागेल.