photo credit - BollywoodCIA
मुंबई 31 जानेवारी: बॉलिवूड अभिनेता (Bollywood actor) जॉन अब्राहम (John Abraham) सोशल मीडियावर (social media) बराच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडिया अकाउंटवरून तो फोटोज चाहत्यांसोबत शेअर करत असतो. जॉन अब्राहम फॅन्ससोबत अगदी नम्रतेने वागतो म्हणून त्याचं कौतुक केलं जातं. जॉन मोठ्या प्रमाणात चित्रपट करत नसला तरी फॅन्ससोबत सेल्फी घेणं, ऑटोग्राफ देणं यामुळे तो चर्चेत असतो. त्याच्या याच स्वभावामुळे त्याचे खूप फॅन्स आहेत. जॉन बॉलिवूडमधील महागड्या कलाकारांपैकी एक आहे. तो एका चित्रपटासाठी तब्बल 15 कोटी रुपये मानधन घेतो, असं म्हटलं जातं. जॉनकडे भरपूर संपत्ती देखील आहे. त्याच्याजवळ महागडी घरं आणि गाड्या आहेत. पण कोट्यवधीचा मालक असलेल्या जॉनचे आई-वडील ऑटो रिक्षा आणि बसने प्रवास करतात. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे अगदी खरं आहे. या संदर्भात राजस्थान पत्रिकाने वृत्त दिलंय. मनमोकळ्या स्वभावासाठी प्रसिद्ध असलेलीPreity Zintaअनेकदा अडकलीय वादाच्या भोवऱ्यात केरळमधील (kerala) कोच्ची इथं जन्मलेल्या जॉनचे वडील मल्याळी ख्रिश्चन आहेत, तर आई इराणी आहे. एवढ्या प्रसिद्ध अभिनेत्याचे आई-वडील असूनही त्याचे आई-वडील अतिशय साधे आहेत. जॉनचे वडील अजूनही कुठेही प्रवास करण्यासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करतात, तर त्याची आई ऑटोने प्रवास करते. आता, एवढ्या श्रीमंत मुलाच्या आई-वडिलांना महागड्या गाड्यांमध्ये फिरता येणं शक्य असताना त्यांना ऑटोरिक्षात फिरण्याची गरजच काय?, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर चला जाणून घेऊयात यामागचं कारण. जॉन अब्राहमचे आई-वडील खूप साधे आहे, त्यांना साधं राहायला आवडतं. त्यामुळे ते कुठेही जाण्या-येण्यासाठी पब्लिक ट्रान्स्पोर्ट (public transport) वापरतात. एका मुलाखतीत जॉन म्हणाला होता कि, “माझे वडील अजूनही पब्लिक ट्रान्स्पोर्टने प्रवास करणं पसंत करतात. तर माझी आई ऑटोने (auto) प्रवास करते. या दोघांनाही साधं आणि सामान्यपणे जगायला आवडतं.”
जॉन स्वतः देखील फार साधं आयुष्य जगतो. तो बॉलिवूडच्या हाय-फाय पार्ट्यांमध्ये अनेकदा साध्या टी-शर्ट, जीन्स आणि चप्पला घालून आलेला दिसतो. याबद्दल जॉन अब्राहम सांगतो कि, त्याचे सहकलाकार त्याला अनेकदा विचारतात की तो पार्टीत शूज (shoes) का घालत नाही? तर यावर तो उत्तर देतो कि तो चप्पल घालणं पसंत करतो, त्याला चप्पल जास्त कंफर्टेबल वाटतात. एका मुलाखतीत जॉनने सांगितलं होतं कि, “मी अतिशय साध्या कुटुंबातून आलो आहे. मी स्वत: खूप साधा आहे. माझे सहकलाकार अनेकदा माझ्याकडे तक्रार करतात कि, तुम्ही कोणत्याही फंक्शनमध्ये किंवा पार्टीमध्ये बूट घालत नाही. मी त्यांना सांगतो कि मला चप्पल वापरणं अधिक चांगलं वाटतं. मला माझे मीडल क्लास संस्कार माहीत आहेत हाच माझा प्लस पॉइंट आहे.”