जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Preity Zinta B'day Spl: मनमोकळ्या स्वभावासाठी प्रसिद्ध असलेली Preity Zinta अनेकदा अडकलीय वादाच्या भोवऱ्यात

Preity Zinta B'day Spl: मनमोकळ्या स्वभावासाठी प्रसिद्ध असलेली Preity Zinta अनेकदा अडकलीय वादाच्या भोवऱ्यात

Preity Zinta Birthday

Preity Zinta Birthday

अभिनेत्री प्रीती झिंटा आज आपला 47वा वाढदिवस साजरा (Preity Zinta Birthday) करत आहे. प्रीती झिंटाबद्दल असं म्हटलं जातं की, ती खूप मनमिळाऊ स्वभावाची आहे. बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकार तीची स्तुती करतात. असं असतानाही प्रीती अनेकदा वादात (Controversy) सापडली आहे. प्रीती झिंटाच्या कारकिर्दीत अनेक वाद निर्माण झाले आहेत.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 31 जानेवारी: अभिनेत्री प्रीती झिंटानं (Preity Zinta) जेव्हा बॉलिवूडमध्ये (Bollywood) पाऊल ठेवलं होतं तेव्हा सगळेच तिचे चाहते झाले होते. निरागस चेहरा आणि बबली नेचरच्या (Bubbly Nature) प्रीती झिंटानं आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक हिट चित्रपट केले. शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान आणि हृतिक रोशन यांच्यासोबत असलेली तिची केमेस्ट्री चांगलीच गाजली होती. हळूहळू चित्रपटांपासून दूर गेलेल्या प्रीतीनं आयपीएलमध्ये (IPL) पाऊल ठेवलं. आपल्या फ्रेंडली नेचरसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रीतीला पुन्हा चित्रपटांमध्ये पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. प्रीती झिंटा आज आपला 47वा वाढदिवस साजरा (Preity Zinta Birthday) करत आहे. प्रीती झिंटाबद्दल असं म्हटलं जातं की, ती खूप मनमिळाऊ स्वभावाची आहे. बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकार तीची स्तुती करतात. असं असतानाही प्रीती अनेकदा वादात (Controversy) सापडली आहे. प्रीती झिंटाच्या कारकिर्दीत अनेक वाद निर्माण झाले आहेत. एक्स-बॉयफ्रेंडवर लावले होते गैरवर्तणुकीचे आरोप प्रीती झिंटा आणि बिझनेसमन नेस वाडिया खूप वर्षं रिलेशनशीपमध्ये होते. नेस वाडिया हा आयपीएल टीम किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) को-ओनरही (Co owner) आहे. दोघांचं रिलेशनशीप संपुष्टात आल्यानंतर2014मध्ये प्रीतीनं आपल्या एक्स बॉयफ्रेंडवर विनयभंगाचा (molestation) आरोप केला होता. या आरोपांनंतर प्रीती आणि नेस वाडिया देशभर चर्चेचा विषय ठरले होते. हा प्रीती झिंटाच्या कारकिर्दीतील हा सर्वांत मोठा वाद ठरला. मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्यानंतर प्रीतीनं माध्यमांकडे या संवेदनशील विषयावर प्रायव्हसी देण्याची विनंती केली होती. तर, नेस वाडियानं प्रीतीचे सर्व आरोप (Allegation) खोटे असल्याचं म्हटलं होतं. ‘बोटॉक्स’ प्रकरणावर भडकली होती प्रीती बॉलिवूडमधील सर्व कलाकारांशी प्रीतीचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मात्र, तुषार कपूर आणि प्रीती झिंटामध्ये वाद निर्माण झाला होता. ‘कॉफी विथ करन’ या टॉक शोमध्ये तुषार कपूरला (Tusshar Kapoor) विचारण्यात आलं होतं की, इंडस्ट्रीतील कोणती व्यक्ती ‘बोटॉक्स’चा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर तुषार कपूरने प्रीती झिंटाचं नाव घेतलं होतं. यावरून प्रीती संतप्त झाली होती. ‘बोटॉक्स’चा (botox) वापर ब्युटी ट्रिटमेंटसाठी केला जातो. शेखर कपूरच्या पत्नीनं केले होते आरोप दिग्दर्शक शेखर कपूरनं (Shekhar Kapur) प्रीती झिंटाला साबणाच्या जाहिरातीत पाहिलं तेव्हा त्यानं तिला साइन करण्याचा निर्णय घेतला. शेखर कपूरनं तिच्यासोबत चित्रपट बनवण्याची घोषणाही केली होती. यानंतर, शेखर कपूरची पत्नी सुचित्रा (Suchitra Krishnamoorthi) हिने प्रीती आणि शेखर यांच्यात क्लोज रिलेशनशीप असल्याचा आरोप केला होता. सुचित्राने मीडियासमोर असे आरोप केल्यानंतर खळबळ उडाली होती. दुसऱ्याच दिवशी, प्रीतीनंही मीडियामध्ये एक निवेदन जारी करून शेखर कपूरच्या पत्नीला डोक्यावर उपचार करण्याचा सल्ला दिला होता. सलमान सोबतही जोडलं गेलं होतं नाव सलमान खान (Salman Khan) आणि प्रीती झिंटा एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. पण, एक ऑडिओ टेप (Audio Tape) व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या लिंक अप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. सलमान आणि ऐश्वर्याच्या संभाषणाची ही टेप होती. ज्यामध्ये सलमाननं प्रीतीसोबतच्या इंटिमेट रिलेशनबद्दल (Intimate relationship) वक्तव्य केलं होतं. यानंतर प्रीती झिंटा आणि सलमान बराच काळ चर्चेत होते. पण नंतर ही टेप फेक असल्याचं सिद्ध झालं होतं. एकूणच प्रीती आत्तापर्यंत अनेकदा वादात सापडली आहे. हे वाद कधी तिच्या पर्सनल लाईफशी तर कधी प्रोफेशनल लाईफशी संबंधित होते. तिला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात