Pankaja Munde
मुंबई, 11 ऑगस्ट : झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारा कार्यक्रम ‘बस बाई बस’ सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे सांभाळत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला या कार्यक्रमात सहभागी होत असलेल्या पहायला मिळतात. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना सुबोध भावे निरनिराळे प्रश्न विचारतात. अशातच पुढच्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला असून पुढच्या पाहुण्या महिला माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde)असलेल्या पहायला मिळत आहे. ‘बस बाई बस’ च्या आगामी भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यामध्ये पंकजा मुंडे पुढच्या भागातील पाहुण्या असल्याचं दिसतंय. याशिवाय सुबोध भावे त्यांना भन्नाट प्रश्न विचारत आहेत. प्रोमोमध्ये दिसतंय की, सुबोध भावेंनी पंकजा ताईंना एक राजकीय प्रश्न विचारला आहे. तुम्ही कधी दुसऱ्या पक्षाचे आमदार कधी फोडलेत का?, यावर पंकजा ताईंनी अतिशय मजेशीर उत्तर दिल्याचं पहायला मिळालं. त्यांनी अभिनय करत या प्रश्नाचं उत्तर दिलं. ‘एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोध बाबू’, असं पंकजा मुंडें म्हणाल्या. हेही वाचा - Rinku Rajguru च्या भावाला पाहिलंत का?; राखीच्या दिवशी शेअर केला खास PHOTO पंकजा मुंडेंचा हा भाग उद्या रात्री साडे नऊ वाजता प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या भागात अजून काय प्रश्न विचारले जाणार आणि पंकडा मुंडे त्या प्रश्नांना कशा प्रकारे उत्तर हे पाहणं महत्त्वाचं आणि रंजक ठरणार आहे. पंकजा मुंडेचा कधीही न पाहिलेला अंदाज पहायला मिळणार आहे. त्यांच्यातील एक अभिनेत्रीही प्रोमोमधून दिसली. त्यामुळे प्रोमो आल्यापासून पुढच्या भागाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
दरम्यान, अखेर 34 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. यानंतर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. त्यांनी ट्विट करुन आपली भावना व्यक्त केली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत संधी न मिळाल्याने पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी वेळोवेळी विविध प्रकार आपली नाराजी व्यक्त केली आहे.