मुंबई 04 जुलै: मिर्झापूरमध्ये एका गँगस्टरच्या रूपात आलेले बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) सध्या एकदम प्रकाशझोतात असतात. ज्या वयात लोक रिटायरमेंट कडे हळूहळू वळायला लागत त्या काळात पंकज आज अनेक सुपरहिट भूमिका करत आहेत. त्यांचं करिअर थोडंसं उशिरा सुरु झालं पण या संयमी अभिनेत्याने धीर सोडला नाही. त्यांच्याबद्दल अनेक किस्से प्रसिद्ध आहेत त्यातलाच एक म्हणजे त्यांच्या (Pankaj Tripathi birthday) वाढदिवसाच्या तारखेचा. आपल्याला एक जन्मतारीख असते. ती वर्षातून एकदाच येते. पण पंकज यांचं नशीब म्हणावं की काय त्यांचा एकाच वर्षात एक वाढदिवस नव्हे तर दोन वेळा वाढदिवस येतो आणि तो ही सेम महिन्यात. याचा एक जबरदस्त किस्सा ते एका मुलाखतीत सांगतात. “माझ्या दोन जन्मतारखा आहेत. एक 5 सप्टेंबर तर दुसरी 28 सप्टेंबर. जरी 28 सप्टेंबर ही बरोबर तारीख असली तरी मला अनेकजण पाच तारखेला शुभेच्छा देतात. पाच सप्टेंबरची एक कहाणी आहे. माझा भाऊ गावातल्या शाळेत माझी ऍडमिशन करायला गेला. त्याला जेव्हा शिक्षकांनी माझी जन्मतारीख विचारली तेव्हा त्याला नीटशी आठवत नव्हती. फक्त सप्टेंबर महिना लक्षात होता. तेव्हा शिक्षिकांनी सांगितलं आठवत नसेल तर पाच सप्टेंबर लिहून टाका. चांगला दिवस आहे शिक्षक दिन आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. त्यामुळे माझ्या डॉक्युमेंटवर हीच तारीख आहे. अनेक कॉन्ट्रॅक्टवर सुद्धा हीच तारीख आहे. काहींना ती तारीख बाहेरून कळली आणि त्यांनी त्या दिवशी शुभेच्छा द्यायला सुरवात केली. मी ही अजून गोंधळ नको म्हणून फार विचार न करता रिप्लाय देऊन टाकतो.” असं पंकज सांगतात.
पंकज यांना एक विनम्र अभिनेता म्हणून ओळखतात. नुकताच त्यांना आयफा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. जेव्हा ते मंचावर पुरस्कार आणायला गेले त्यांच्यासाठी सलग काही मिनिटं टाळ्या वाजत होत्या. त्यांनी आभार मानताना हे सांगितलं सुद्धा “तुमच्या या टाळ्यांनीच माझं आभाराचं भाषण केलं, तुमचं प्रेम असंच कायम राहू दे” पंकज सध्या अनेक A-lister कलाकरांपेक्षाही जास्त डिमांड मध्ये आहेत. त्यांच्या अभिनयकौशल्यावर सगळेच फिदा आहेत. हे ही वाचा- Samantha Ruth Prabhu: ‘अनेक अपयशी लग्नांचं कारण फक्त तूच!’ ‘पुष्पा’ फेम अभिनेत्रीचा करण जोहरवर थेट आरोप!
पंकज त्रिपाठी वर्क फ्रंटवर सध्या फुल फॉर्मात आहेत. त्यांच्या अनेक अप्रतिम कलाकृती येत्या काळात भेटीला येणार आहेत. ते येत्या काळात लालसिंग चढ्ढा, ओह मे गॉड 2, अभि तो पार्टी सुरू हुई है अशा कलाकृतीत पाहायला मिळतील अशी माहिती समोर येत आहे.