शाहिदचे वडील पंकज कपूर हे प्रसिद्ध अभिनेते आहेत.
मुंबई, 29 मे : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरला अभिनयाची प्रेरणा त्याच्या वडिलांकडून मिळाली आहे. शाहिदचे वडील पंकज कपूर हे प्रसिद्ध अभिनेते होते. आज पंकज कपूर यांचा 69 वा वाढदिवस आहे. 29 मे 1954 रोजी पंजाबमधील लुधियाना येथे जन्मलेल्या पंकज कपूर यांनी वयाच्या अवघ्या ४ व्या वर्षापासून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. पंकज यांचे वडील प्राध्यापक होते आणि त्यांच्या काळातील सुवर्णपदक विजेते होते. पंकजच्या आईने त्यांना लहानपणापासूनच छोट्या-छोट्या कामांचे प्रशिक्षण दिले होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पंकज कपूर यांनी अभिनयाच्या जगात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमावलं. यासोबतच त्यांचं लव्ह लाईफ देखील चर्चेत राहिलं आहे. अभिनेता पंकज कपूर यांनी अनेक उत्तम टीव्ही मालिका आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी 1982 मध्ये आरोहण या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर पंकजने रिचर्ड अॅटनबरो यांच्या गांधी चित्रपटात महात्मा गांधींचे द्वितीय सचिव प्यारेलाल यांची भूमिका साकारली, ज्याला एक दोन नव्हे तर आठ ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. आपल्या चमकदार अभिनय प्रवासासोबतच, पंकज कपूर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिले आहेत.
पंकज कपूर आणि नीलिमा अझीम यांची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. पंकज यांनी वयाच्या 19 व्या वर्षी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांची भेट नीलिमा अझीम यांच्याशी झाली. त्या दिवसांत नीलिमा तिथे कथ्थकचे प्रशिक्षण घेत होत्या. ड्रामा स्कूलमध्येच दोघांची मैत्री झाली दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 2 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी 1979 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांचा मुलगा शाहिद कपूरचा जन्म झाला. सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीपने घटवलं तब्बल 26 किलो वजन; निर्माते म्हणाले ‘4 महिने त्याने फक्त एक खजूर…’ शाहिदच्या जन्मानंतर मात्र दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. जवळजवळ 9 वर्षे एकत्र वैवाहिक आयुष्य घालवल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पंकज आणि नीलिमा वेगळे झाले तेव्हा शाहिद केवळ अडीच वर्षांचा होता. एका मुलाखतीदरम्यान नीलिमाने घटस्फोटाचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, ‘वेगळे होण्याचा निर्णय माझा नसून पंकजचा होता. तो आयुष्यात पुढे गेला होता. माझ्यासाठी पुढे जाणे सोपे नव्हते, पुढे जाण्यासाठी बरीच वर्षे लागली. आमचा घटस्फोट झाला तो काळ माझ्यासाठी खूप अवघड होता.’ असं त्यांनी सांगितलं होतं. नीलिमा अझीमपासून घटस्फोट घेतल्यानंतर पंकज कपूर यांची भेट अभिनेत्री सुप्रिया पाठकसोबत झाली. 1986 साली ‘नया मौसम’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली. पण हा चित्रपट आजवर प्रदर्शित झाला नसला तरी या चित्रपटामुळे पंकज यांना त्यांची जीवनसाथी नक्कीच भेटली. जेव्हा सुप्रिया पंकजला भेटली तेव्हा सुप्रियाचाही घटस्फोट झाला होता. काही काळातच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
सुप्रिया-पंकज बहुतेक वेळ एकत्र घालवू लागले. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर पंकज यांना सुप्रिया सोबत लग्न करायचं होतं. पण सुप्रियाच्या आईला हे नाते अजिबात मंजूर नव्हते. मात्र, सुप्रियाने आईच्या विरोधात जाऊन पंकज कपूरसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी 1989 मध्ये लग्न केले. लग्नानंतर पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक मुलगी सना आणि मुलगा रुहान कपूर यांचा जन्म झाला.