मुंबई, 28 मार्च: ऑस्कर हा (Oscar 2022) चित्रपट जगतातील असा एक पुरस्कार आहे, ज्याची जगभरातील सेलिब्रिटी वाट पाहत असतात. हॉलिवूड चित्रपट ‘CODA’ ने यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर (Oscar 2022 Best Film CODA) पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे या चित्रपटाला स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळाले आहे. ‘CODA’ हा ‘चाइल्ड ऑफ डेफ अडल्ट्स’ चा शॉर्ट फॉर्म आहे, ज्याचा अर्थ ‘बधिर प्रौढांचे पाल्य’ असा आहे. या चित्रपटाला 2014 साली आलेल्या ‘La Famille Bélier’ या फ्रेंच चित्रपटाचा इंग्रजी रिमेक म्हटले आहे. मात्र हा सिनेमा पाहून तुम्हाला कदाचित सलमान खान (Salman Khan Hindi Movie) च्या एका हिंदी चित्रपटाची आठवण होईल. काय आहे CODA ची कथा? ‘CODA’ चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, त्याच्या शीर्षकानुसार, हा चित्रपट एका कर्णबधिर कुटुंबातील रुबी (एमिलिया जोन्स) या 17 वर्षीय मुलीच्या संघर्षाची कथा आहे. रुबीचे पालक ऐकू किंवा बोलू शकत नाहीत. रुबी तिच्या कुटुंबातील एकमेव सदस्य आहे जी ऐकू शकते आणि बोलू शकते. अशा परिस्थितीत रुबी कुटुंबासाठी इंटरप्रेटरची भूमिका बजावते, ती जगाशी संवाद साधण्याचा त्यांचा एकमेव मार्ग आहे. मात्र अशा स्थितीत तिला स्वत:च्या जीवनासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. हे वाचा- Will Smith कडून Oscar च्या मंचावर कानशिलात खाल्ल्यानंतर Chris Rock चा मोठा निर्णय रुबी तिच्या कुटुंबाला मत्स्य व्यवसायात मदत करत असते, पण तिची स्वप्न वेगळी असतात. रुबीला गायिका बनून स्वत:ची स्वप्न पूर्ण करायची असतात. परंतु तिचे कुटुंब घाबरते आणि गायक होण्याच्या तिच्या निर्णयाच्या विरोधात जाते. रुबीला वाटते की जर ती तिच्या स्वप्नांच्या मागे गेली तर तिच्या कुटुंबीयांना त्रास होईल आणि यामुळे कुटुंबाच्या मासेमारीच्या व्यवसायावरही परिणाम होईल. तुम्हाला आठवला का सलमानचा सिनेमा? जर तुम्ही सलमान खान आणि मनीषा कोईराला यांचा 1996 साली आलेला ‘खामोशी - द म्युझिकल’ (Salman Khan and Manisha Koilara Khamoshi: The Musical) हा चित्रपट पाहिला असेल, तर तुम्हाला या दोन्ही चित्रपटांची कथा काहीशी मिळती-जुळती वाटेल. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान, मनीषा कोईराला, नाना पाटेकर आणि सीमा बिस्वास मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात मनीषा कोईराला बोलू आणि ऐकू न शकणाऱ्या आई-वडिलांच्या मुलीच्या- अॅनीच्या भूमिकेत आहे. तिला देखील संगीताची आवड असते. पण एका घटनेमुळे ती गाण्यापासून दूर जाते. ‘राज’ ही भूमिका करणाऱ्या सलमान खानच्या येण्याने तिच्या आयुष्यात संगीत पुन्हा येतं. त्यांच्या प्रेमाची ही कहाणी आहे.