JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Nusrat Jahan यांनी बाळाचं नाव ठेवलं ईशान, सिंगल मदर बनून करणार मुलाचा सांभाळ?

Nusrat Jahan यांनी बाळाचं नाव ठेवलं ईशान, सिंगल मदर बनून करणार मुलाचा सांभाळ?

तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) यांनी काही दिवसांपूर्वीच मुलाला जन्म दिला आहे. दरम्यान त्या आता सिंगल मदर म्हणून मुलाचा सांभाळ करणार का या चर्चांना उधाण आलं आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑगस्ट: तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) यांनी काही दिवसांपूर्वीच मुलाला जन्म दिला आहे. त्यांनी गुरुवारी मुलाचं नावही जाहीर केलं आहे. नुसरत यांच्या मुलाचं नाव ईशान (Yishaan)ठेवण्यात आलं आहे. दरम्यान मीडिया अहवालानुसार नुसरत जहाँ आणि त्यांच्या मुलाची तब्येत आता ठीक आहे. सध्या ते दोघेही डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. या दरम्यानच अभिनेत्री तिच्या मुलाच्या नावाचा खुलासा केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नुसरत जहाँ यांना आजच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. नुसरत जहाँ यांना बुधवारी कोलकाता याठिकाणी असणाऱ्या एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यांनी गुरुवारी साधारण 12.20 च्या सुमारास मुलाला जन्म दिला. दरम्यान नुसरत यांच्या प्रेगनन्सीचीही विशेष चर्चा रंगली होती. अभिनेता यश दासगुप्ताने नुसरत यांना रुग्णायलामध्ये भरती केल्याची माहिती मिळाली होती. यश यावेळी त्यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्येच होता. मीडिया अहवालानुसार, सध्या नुसरत यश दासगुप्ता (Yash Dasgupta) याच्यासह रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्यावर्षी नुसरत आणि निखिल जैन यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता नुसरत सिंगल मदर (Single Mother) म्हणून बाळाचे संगोपन करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

काही महिन्यांपूर्वी नुसरत आई होणार असल्याचं समजलं होतं. त्यानंतर तिचा पूर्व पती निखिल जैन (Nikhil Jain) आणि नुसरत यांचा वाद माध्यमांसमोर आला होता. निखिल आणि नुसरत आता एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. दरम्यान निखिल यांनी नवजात बाळाला आणि त्याच्या आईला शुभेच्छा दिल्या होत्या, त्यांनी असं म्हटलं होतं की, आमच्यामध्ये वैयक्तिक मतभेद असू शकतील, तरी देखील मी बाळाला आणि त्याच्या आईला शुभेच्छा देतो. मी मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो.'

नुसरत यांचं लग्न 2019 मध्ये निखिल जैनशी झालं होतं. तुर्कीमध्ये दोघांनी धुमधडाक्यात लग्न केलं होतं. काही मोजक्या व्यक्ती या लग्नाला उपस्थित होत्या. त्यानंतर भारतात त्यांनी जंगी सेलिब्रेशन करत रिसेप्शन दिलं होतं. त्यामध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या. मात्र वर्षभरातच दोघांमध्ये विवाद सुरू झाले. विवादानंतर नुसरतने हे लग्नच अमान्य केलं होतं आणि आम्ही पती पत्नी नसल्याचं म्हटलं होतं. नुसरत यांनी हे लग्न बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या