JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / करण- निशाचा जुना बेडरुम व्हिडीओ व्हायरल; 'आधी असं होतं नातं'

करण- निशाचा जुना बेडरुम व्हिडीओ व्हायरल; 'आधी असं होतं नातं'

करण आणि अभिनेत्री निशा रावल हे टीव्ही इंड्रस्ट्रीचं लोकप्रिय कपल होतं. पण अचानक त्यांच्यातील मोठ्या विवादाने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 9 जून: गेल्या काही दिवसांपासून टीव्ही इंडस्ट्रीतील (TV) प्रसिद्ध कपल निशा रावल (Nisha Rawal) आणि अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) यांच्यातील सुरु असलेल्या वादाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. निशानं करणवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केलेत. त्यामुळे करणला काही तास कोठडीतही जावं लागलं होतं. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Ye Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतून घराघरात पोहोचलेला नैतिक म्हणजेच अभिनेता करण मेहरा. करण आणि निशा रावल हे टीव्ही इंड्रस्ट्रीचं लोकप्रिय कपल होतं. पण अचानक त्यांच्यातील मोठ्या विवादाने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. निशाने करणवर आरोप लावले तर त्यानंतर त्याने किती निर्दयीपणे मारहाण केली आहे याचा एक फोटोही समोर आला. पण निशाने स्वतःच डोकं फोडून घेतलं असल्याचं करणने म्हटलं.

यानंतर निशाने करणचं बाहेर अफेअर सुरू असल्याचं म्हटलं. त्यानंतर अभिनेत्री हिमांशी पराशरसोबतचे (Himanshi Parashar) त्याचे फोटोही व्हायरल झाले. त्यामुळे दोघांमधला वाद अतिशय चिघळत चालला आहे. पण आता करण आणि निशाचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ते अतिशय वेगळ्या पद्धतीने एकमेकांशी वागत आहेत.

संबंधित बातम्या

व्हिडीओत निशा आणि करण एकमेकांसोबत मजा – मस्ती करताना दिसत आहे. तर निशा एक व्हिडीओ बनवत आहे. तर दोघेही एकमेकांसोबत आनंदी वेळ घालवत आहेत. त्यामुळे हे आनंदी कपल अचानक एकमेकांच्या विरोधात अशाप्रकारे का उभे राहिले असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.

निळ्याशार ड्रेसमध्ये हिना दिसली खुलून; चाहते म्हणाले ‘तूच खरी क्वीन’

दरम्यान निशा ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. पती आणि मुलासोबत फोटो तसंच व्हिडिओ ती पोस्ट करायची. त्यांच्या या व्हिडिओवर त्यांना अनेक कमेंट्सही यायच्या. पण आता त्यांच्यातील हे वाद पाहून अनेकांनी हे फोटो आणि व्हिडिओ केवळ सोशल मीडियावरील चित्र आहे असंही म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या