JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रंग माझा वेगळा मालिकेत नव्या कार्तिकीची एंट्री, 'ही' बालकलाकार घेणार साईशाची जागा

रंग माझा वेगळा मालिकेत नव्या कार्तिकीची एंट्री, 'ही' बालकलाकार घेणार साईशाची जागा

बालकलाकार साईशा भोईर हिनं रंग माझा वेगळा मालिकेतून एक्झिट घेतल्यानं मालिकेत नवी कार्तिकी कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर आता मालिकेत नव्या कार्तिकीची एंट्री होणार आहे.

जाहिरात

रंग माझा वेगळा मालिकेत नव्या कार्तिकीची एंट्री, 'ही' बालकलाकार घेणार साईशाची जागा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जून:  स्टार प्रवाहवरील ( Star Pravah) रंग माझा वेगळा ( Rang Majha Vegla) मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. मालिकेतील कार्तिकीची भूमिका साकारणारी बालकलाकार साईशा भोईरनं ( Saisha Bhoir) हिनं मालिका सोडली. साईशानं मालिका सोडल्यानं मालिकेत आता कार्तिकीची ( Kartiki) भूमिका कोण साकारणार आहे याकडे सर्वांच लक्ष होतं. अखेर मालिकेत नव्या कार्तिकीनं एंट्री घेतली असून नवी कार्तिकी ( New Kartiki) ही बालकलाकार मैत्रेयी दाते (  Maitreyi Date) ही साकारणार आहे. मैत्रेयी आणि दीपिका ( Deepika ) यांचं एकत्र फोटोशूट देखील पार पडलं असून नव्या कार्तिकीचे फोटो समोर आले आहेत. मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर असताना साईशानं मालिका सोडल्यानं प्रेक्षकही नव्या कार्तिकीची वाट पाहत होते. मात्र आता लवकरच बालकलाकार मैत्रेयी दाते कार्तिकीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मैत्रेयीही अभिनयाबरोबरच नृत्यही करते.  मैत्रेयीला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड आहे. मैत्रेयीची ही आवड लक्षात घेऊन तिच्या पालकांनी अभिनय अकादमीमध्ये तिचा प्रवेश घेतला. त्याचप्रमाणे मैत्रेयीनं बऱ्याच जाहिराती आणि बालनाट्यांमध्येही काम केलं आहे. अभिनयासोबतच मैत्रेयी शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेत असून तिला चित्रकलेचीही आवड आहे. हेही वाचा - ‘पुष्पा-2’मध्ये श्रीवल्लीच्या भूमिकेला लागणार कात्री? ‘हे’ आहे कारण

मैत्रेयीचं कार्तिकी या पात्रासाठीचं फोटोशूट झालं असून ती शुटींगसाठी सेटवर देखील पोहोचली आहे. मालिकेच्या टीमनं मैत्रेयीचं खास स्वागत केलं. सेटवर दीपिका म्हणजे स्पृहाबरोबर मैत्रेयीची छान मैत्री झाली आहे.  दोघेही शुटींगच्या मधल्या वेळेत मज्जा मस्ती, गप्पा मारतात. दोघीही एकत्र अभ्यासालाही बसतात. मैत्रेयीचं खास वैशिष्ट्य म्हणजे, मैत्रेयी गेल्या अनेक दिवसांपासून रंग माझा वेगळा ही मालिका पाहत आहे. स्टार प्रवाहवरील ही तिची आवडती मालिका आहे असं तिनं सांगितलं. त्यातही कार्तिकी आणि दीपिका यांची जोडी तिला फार आवडते असंही ती म्हणली. त्यामुळे मैत्रीये शुटींगच्या पहिल्याच दिवशी सेटवर सर्व कलाकारांबरोबर चांगलीच रमली आहे. मैत्रेयीसाठी हा मालिकेचा सेट नसून दुसरं घरच झालं आहे. आता मालिकेत आलेली नवी कार्तिकी हे पात्र कसं साकारणार? साईशाप्रमाणेच मैत्रीयेही प्रेक्षकांची मन जिंकेल अशी अपेक्षा आहे.  सोशल मीडियावर देखील नव्या कार्तिकचं प्रेक्षकांनी स्वागत केलं आहे. जुनी कार्तिकी आणि नवी कार्तिकी अगदी हुबेहूब शोधली आहे असंही प्रेक्षकांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या