JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Nava Gadi Nava Rajya: रमा आणि आनंदीची दांडी गुल; मालिका चालू होण्याआधीच मिम्सचा पाऊस

Nava Gadi Nava Rajya: रमा आणि आनंदीची दांडी गुल; मालिका चालू होण्याआधीच मिम्सचा पाऊस

झी मराठीवर दाखल होणारी ही नवी मालिका सुरु होण्याआधीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येताना दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 01 ऑगस्ट: झी मराठीवर येत्या 8 ऑगस्टपासून ‘नवा गडी नवं राज्य’ नावाची एक आगळीवेगळी मालिका सुरु होणार आहे. रमाचा अर्धवट राहिलेला संसार पूर्ण करायला आनंदी येऊन दाखल होते पण तिचा नेमका स्वीकार होणार आहे का नाही अशा वेगळ्याच विषयाला हात घालणारी ही नवीन मालिका असणार आहे. मालिकेची झलक तर नक्कीच प्रभावित करणारी आहे पण सध्या एक वेगळीच गोष्ट लक्ष वेधून घेताना दिसत आहे. (nava gadi nava rajya new serial) मालिका सुरु होण्याआधीच सुरु झालेल्या मिम्समुळे सध्या मालिकेची चर्चा होताना दिसत आहे. झी मराठीच्या सोशल मीडियावर सध्या एक मीम बरंच गाजताना दिसत आहे. ‘संसाराचं माप ओलांडून रमाचा संसार सांभाळायला आली आनंदी” असं वाक्य आपल्याला यामध्ये ऐकू येतं आणि क्षणातच सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालणारं एक मीम या व्हिडिओमध्ये आल्याचं दिसत आहे. इंटरनेटवर सध्या ‘बहोत जगा है, नही जगा है” असा एक व्हिडिओ viral झाला असून बसमध्ये सीटवरून दोन व्यक्तींमध्ये भांडण सुरु असलेलं दिसत आहे. याच व्हिडिओचा वापर मालिकेचं प्रमोशन करायला वापरून त्यावर भन्नाट मीम बनवल्याचं बघायला मिळत आहे. हे ही वाचा-  Urmila Nimbalkar: प्रेग्नंसीदरम्यान उर्मिलाने ‘त्या’ कटू प्रसंगाला दिलं तोंड; आठवणी शेअर करताना अश्रू अनावर या मालिकेतील कलाकारांनी सुद्धा हे मीम शेअर केलं असून यावर चाहते भरभरून रिस्पॉन्स देताना दिसत आहेत. या मालिकेतून राधिका मसाल्यांची मालकीण म्हणून ओळख मिळवलेली अभिनेत्री अनिता दाते-केळकर पुन्हा एकदा एका भन्नाट भूमिकेत दिसणार आहे. तर पल्लवी पाटील ही अभिनेत्री सुद्धा छोट्या पडद्यावर दिसून येणार आहे. तसंच मालिकेत साईशा भोईर ही चिमुकली अभिनेत्री, कश्यप परुळेकर, वर्षा तांदळे अशी स्टारकास्ट दिसून येणार आहे.

संबंधित बातम्या

मालिकेचा विषय बराच वेगळा ठरत असून नेमकं मालिकेत काय होणार हे पाहायला प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. झी मराठीवर सध्या अनेक नवनव्या मालिका दाखल होताना दिसत आहेत. येत्या काळात नवा गडी नवं राज्य यासोबत तू चाल पुढं, अप्पी आमची कलेक्टर, अशा अनेक मालिका दाखल होताना दिसणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या