JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Video: नसीरुद्दीन शहांनी हिंदुस्तानी मुस्लिमांना सुनावलं; तालिबानचं समर्थन करणाऱ्यांना दिली चपराक

Video: नसीरुद्दीन शहांनी हिंदुस्तानी मुस्लिमांना सुनावलं; तालिबानचं समर्थन करणाऱ्यांना दिली चपराक

जगभरातून अद्याप पाकिस्तान आणि चीन वगळता कोणीही तालिबानची पाठराखण केली नाही. मात्र भारतात काहीजण याचं समर्थन करताना दिसत आहेत. यावर अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई  2 सप्टेंबर : सध्या जगभरात अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan crisis) घडत असलेल्या परिस्थितीवर बोललं जात आहे. तसेच जगभरातून टीकाही केली जात आहे. तालिबानने (Taliban) जबरदस्ती करत अफगाणिस्तानवर मिळवलेला ताबा जगासाठीही धोका निर्माण झाला असल्याचं सांगितलं जातं आहे. पण भारतातच काही लोक हे तालिबानच समर्थन करताना दिसत आहेत. जगभरातून अद्याप पाकिस्तान आणि चीन वगळता कोणीही तालिबानची पाठराखण केली नाही. मात्र भारतात काहीजण याचं समर्थन करताना दिसत आहेत. यावर अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. काही भारतीय मुस्लिम (Indian Muslim) तालिबानच मागील काही दिवसांपासून समर्थन करत आहेत. काहींनी मीडिया समोरही याची कबुली दिली.  नसीरुद्दीन यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते तालिबानच्या समर्थनावर रोष व्यक्त करताना दिसत आहेत.

सुहाना खान ते न्यासा देवगण परदेशात शिकत आहेत हे ‘Star Kids’

व्हिडिओत त्यांनी म्हटलं आहे, “सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता पुन्हा आली आहे. जगासाठी हा चींतेचा विषय आहे. मात्र भारतीय मुस्लिमांनी यावर जल्लोष साजरा करणं कमी धोकादायक नाही.”

संबंधित बातम्या

पुढे त्यांनी म्हटलं, “हिंदुस्तानी इस्लाम इतर जगभरातील इस्लाम पेक्षा नेहमीच वेगळा राहिला आहे. देव करो ती वेळ कधीही येऊ नये की त्याला ओळखनही विसरून जाऊ. आज हिंदुस्तानी मुस्लिमांनी स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज आहे की, त्यांना मॉडर्न आणि रिफॉर्म इस्लाम पाहिजे की पूर्वीसारखं आजही वहशिपण. मी एक हिंदुस्तानी मुस्लिम आहे.” शेवटी नसीरुद्दीन यांनी म्हटलं की, “मी एक हिंदुस्तानी मुसलमान आहे आणि जसं की मिर्झा गालिब काही शतकांपूर्वी म्हटले होते, माझ्या देवाशी माझं नातं अनौपचारिक आहे. मला शासन असलेल्या धर्माची गरज नाही.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या