JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बबिताला ‘तारक मेहता’मधून दाखवला बाहेरचा रस्ता? निर्मात्यांचा मोठा खुलासा

बबिताला ‘तारक मेहता’मधून दाखवला बाहेरचा रस्ता? निर्मात्यांचा मोठा खुलासा

त्या वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणानंतर बबिता तारक मेहता मालिकेत झळकलेली नाही, कारण…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 24 जुलै**:** तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय विनोदी मालिका आहे. गेली 13 वर्ष ही मालिका सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. परिणामी या मालिकेतील सर्वच कलाकार जणून प्रेक्षकांच्या घरातील सदस्यच झाले आहेत. त्यामुळे मालिकेत एक कलाकार देखील दिसेनासा झाला तरी प्रेक्षक अस्वस्थ होतात. सध्या अशीच काहीशी अस्वस्थता अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun dutta) उर्फ बबीता भाभीमुळे (Babitaji) निर्माण झाली आहे. गेल्या काही काळापासून ती मालिकेत झळकलेली नाही. या पार्श्वभूमीवर तिला मालिकेतून काढलं की काय? अशी शंका प्रेक्षकांच्या मनात येत आहे. दिलीप कुमारांमुळे मनोज कुमार यांनी बदललं आपलं खरं नाव; काय होता तो किस्सा? मालिकेत सध्या मिशन काला कौवा हा ट्रॅक सुरू होता. मात्र यामध्ये बबिता कुठेच दिसली नाही. अगदी तिचा पती अय्यर देखील दिसला मात्र बबिताचा साधा उल्लेखही केला गेला नाही. यामुळे प्रेक्षक चिंतेत होते मात्र निर्माता असित मोदी यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. “बबिताला तारक मेहतामधून काढलेलं नाही. कृपया प्रेक्षकांची काळजी करू नये. सध्या कोरोनाच्या नियमांमुळे सेटवर गर्दी करता येत नाही. त्यामुळे मोजक्याच कलाकारांसोबत आम्ही काम करतोय. कथानकानुसार आम्ही सेटवर कलाकारांना बोलावतो.” असं स्पष्टीकरण निर्मात्यांनी दिलं. शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ! चौकशीदरम्यान काईम ब्रांचने विचारले हे 10 प्रश्न मुनमुन दत्ता गेल्या काही काळात एका वादग्रस्क व्हिडीओमुळे चर्चेत होती. शेअर केलेल्या व्हिडीओत तिने जातिवाचक शब्दांचा वापर करत समाजातील ठराविक समूहाचा अपमान केला होता. यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या. या व्हिडीओत ती म्हणाली, “मी लवकरच यूट्यूबर दिसणार आहे. त्यासाठी मला सुंदर दिसायचं आहे. मला ** सारखं दिसायचे नाही’. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त होऊ लागला. त्यानंतर तिनं ट्विटरद्वारे माफी देखील मागितली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या