JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Exclusive: धमकी प्रकरणी सलमान खानचा नोंदवण्यात आला जबाब; म्हणाला मी, लॉरेन्स बिश्नोईला ओळखतो.....

Exclusive: धमकी प्रकरणी सलमान खानचा नोंदवण्यात आला जबाब; म्हणाला मी, लॉरेन्स बिश्नोईला ओळखतो.....

सलमान खानला (Salman Khan) धमकीचं पत्र पाठवणाऱ्यांचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आज सलमान खानचा जबाब नोंदवला. यावेळी महत्त्वाची माहिती सलमाननं पोलिसांना दिली.

जाहिरात

Exclusive: धमकी प्रकरणी सलमान खानचा नोंदवण्यात आला जबाब; म्हणाला मी, लॉरेन्स बिश्नोईला ओळखतो.....

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 जून:  बॉलिवूडमध्ये सध्या सलमान खानला (Salman Khan) मिळालेल्या धमकीनंतर एकच खळबळ उडाली आहे. सलमानला पोलिसांकडून संरक्षण देण्यात आलं आहे. सलमान खानला धमकीचं पत्र पाठवणाऱ्यांचा पोलीस तपास करत आहेत. असं असताना आता सलमान खानचा याप्रकरणी पहिल्यांदा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवल्याचे आल्याचे  समोर  आलं आहे. याप्रकरणाशी काही संबंधित प्रश्न त्याला  विचारण्यात आले. मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  अलीकडच्या काळात  कोणता थ्रेट कॉल किंवा मेसेज आला आला असल्याबद्दल यावेळी सलमानला विचारण्यात आलं शिवाय कोणाशी याकाळात वाद झाला आहे की याबद्दल देखील त्याला विचारण्यात आलं. यावर सलमाना खान देखील सांगितल की, मला कोणाताही थ्रेट कॉल किंवा मेसेज आला नव्हात व माझे कोणाशीही भांडण झालेले नाही. याशिवाय सलमानला गोल्डी बरार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या गॅंगकडून कोणती धमकी आल्याचे विचारण्यात आले. मी गोल्डी बरार  ओळखत नसल्याचे सांगत सलमान खानने यावेळी सांगितले. तसेच लॉरेन्स बिश्नोईला मी इतर लोकांप्रामाणेच ओळखतो तेही  काही वर्षापूर्वी झालेल्या एका प्ररणामुळं, असं देखील सलमान खानने यावेळी सांगितले. 5 जून ला मिळाली होती धमकी रविवारी 5 जून रोजी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचं पत्र मिळालं होतं. ‘सलमानचाही सिद्धू मूसेवाला करू’, अशी धमकी त्याला देण्यात आली होती. या धमकीची माहिती महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाला मिळताच सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर क्राईम ब्राँचची ( Mumbai Crime Branch) एक टिम तात्काळ दाखल झाली आहे. ज्या ठिकाणी धमकीचं पत्र मिळालं त्या ठिकाणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.  सलमान स्वत: घराबाहेर येऊन क्राइम ब्राँचच्या टिमला सहकार्य करताना दिसला. आता याप्रकरणी त्याने जबाब नोंदवल्याचे समोर आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या