मुंबई, 7 मे- अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ( Mrunmayee Deshpande) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नेहमी ती तिचे व्हिडिओ तसेच फोटो शेअर करत असते. शिवाय तिच्या कामाबद्दल अपडेट देखील देत असते. याशिवाय बहीण गौतमीसोबत देखील भन्नाय व्हिडिओ शेअर करत असते. मृण्मयी देशपांडेने नुकताच गौतमीसोबतचा ( gautami deshpande ) एक सुंदर फोटो शेअर केला आहे. सध्या या देशपांडे सिस्टर्सचा हा क्यूट फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोंवर चाहत्यांसह सेलेब्सकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. मृण्मयी देशपांडे नुकताच बहीण गौतमीसोबत एक फोटो शेअर केला. या फोटोला तिनं सुंदर कॅप्शन देखील दिली आहे. सध्या ही फोटो कॅप्शन चांगलीच चर्चेत आली आहे. तिनं म्हटलं आहे की, मला माहिती आहे ती जास्त चांगली दिसते! तिच्या यो कॅप्शनवर सेलेब्सनी व चाहत्यांनी देखील भन्नाट कमेंट करत देशपांडे सिस्टर्सच्या बॉन्डिंगचं कौतुक केलं आहे. वाचा- ‘तुझं आणि शिव दादाचं..’ यूजर्सच्या प्रश्नावर भडकली वीणा जगताप,म्हणाली…. एका चाहत्यांने म्हटलं आहे की, तुम्ही दोघी पण सुंदर दिसता..तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, तुम्ही दोघी पण एकसारख्या दिसता. आणखी एकानं म्हटलं आहे की, Agreed…. विषयच नाही….❤️😍 याशिवाय मृण्मयी देशपांडेच्या कॅप्शनवरून एकानं म्हटलं आहे की, असे कोण कोणास म्हणाले ????..अशा अनेक भन्नाय कमेंट या दोघींच्या फोटोवर आल्या आहेत. वाचा- ठरलं! किम शर्मा-लिएंडर पेस लवकरच बांधणार लग्नगाठ, ‘या’ पद्धतीने पार पडणार विवाह मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे या दोन्ही बहिणी खूप चांगल्या अभिनेत्री असल्याचे सिद्ध केले आहे. त्या अभिनयासोबतच आणखी एका गोष्टीत अव्वल आहेत. गौतमी आणि मृण्मयी दोघीही उत्तम गायिका आहे. अनेक वेळा त्या दोघी त्यांचे गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. मृण्मयी आणि गौतमी यांना गाण्याचा वारसा त्यांच्या आजीकडून मिळाला आहे.
झी मराठीवरील ”माझा होशील ना” या मालिकेतून गौतमी देशपांडे घराघरात पोहोचली. या मालिकेत गौतमी साकारत असलेली सईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत गौतमीने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.