JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘मी लाखाची पोशिंदी’; ट्रोलर्सला धन्यवाद म्हणणाऱ्या मृण्मणी देशपांडेचे Meme viral

‘मी लाखाची पोशिंदी’; ट्रोलर्सला धन्यवाद म्हणणाऱ्या मृण्मणी देशपांडेचे Meme viral

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत मृण्मयीने ट्रोलिंगवर भाष्य केलं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 21 जुलै: मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दर्जेदार अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मृण्मयी सध्या सारेगमप लिटिल चॅम्पस (Saregamapa Lil Champs 2021) या संगीत शोमुळे चर्चेत आहे. ती या शोची होस्ट आहे. मात्र तिचं सुत्रसंचालन पाहून तिची खिल्ली उडवली जात आहे. यावर मग तिने देखील ‘आमच्या शोमुळे ट्रोलर्सचा धंदा चाललाय’ असं म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिलं. (Mrunmayee Deshpande Meme viral) परिणामी आता तिच्या याच उत्तरावरील मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शिल्पा शेट्टी पॉर्न प्रकरणात सामिल? या मॉडेलकडे मागितला होता न्यूड व्हिडीओ

संबंधित बातम्या

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत मृण्मयीने ट्रोलिंगवर भाष्य केलं होतं. “मी ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करते. मला काहीच फरक पडत नाही ते माझ्याबद्दल काय बोलतात. मी केवळ माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतेय. आणि तसेही आमच्या शोमुळेच या ट्रोलर्सचा धंदा चालला आहे.” असं म्हणत तिने ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला होता. परंतु लक्षवेधीबाब म्हणजे आता या मुलाखतीवरून देखील तिची खिल्ली उडवली जात आहे.  तिच्यावर अनेक गंमतीशीर मिम्स व्हायरल केले जात आहेत. ‘ताई घरातील मुलं घाबरली’; Over Makeup मुळे Shruti Marathe troll

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

मृण्मयी एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘कुंकू’, ‘अग्निहोत्र’ या मालिकेतून मृण्मयी घराघरात पोहचली होती. त्यानंतर ‘कट्यार काळजात घुसली’, ‘मोकळा श्वास’, ‘फत्तेशिकस्त’, ‘नटसम्राट’, ‘शिकारी’ अशा अनेक चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर तिच्या अभिनयाची छाप सोडली. मृण्मयीने केवळ चित्रपट, मालिकांपूरताच तिचा प्रवास मर्यादित न ठेवता ती दिग्दर्शकीय क्षेत्रात उतरली. ‘मन फकीरा’ या चित्रपटाचं तिने पहिल्यांदाच दिग्दर्शन केलं आहे. मृण्मयीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सोशल मीडियावर तिला मोठया प्रमाणात फॉलो केले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या