JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / घोड्या सारख्या उड्या कशा मारायच्या पाहायचं असेल तर मृण्मयी आणि गौतमीचा हा भन्नाट Video नक्की पाहा!

घोड्या सारख्या उड्या कशा मारायच्या पाहायचं असेल तर मृण्मयी आणि गौतमीचा हा भन्नाट Video नक्की पाहा!

आजपर्यंत तुम्ही बॉलिवूडच्या बहिणींचे अनेक कारनामे ऐकले असतील पण मराठीमध्ये सुद्धा अशी एक सख्ख्या बहिणींची जोडी खूप प्रसिद्ध आहे ज्यांच्या रील्सवर चाहते फिदा आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 13 जून: मराठी चित्रपटसृष्टीत अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. कुठे दोन भावांची जोडी, कुठे मित्रमैत्रिणीचं जोडी तशी दोन बहिणींची अजून एक जोडी खूप प्रसिद्ध आहे ज्या (Mrunmayee Deshpande) आहेत मृण्मयी आणि (Gautami Deshpande) गौतमी देशपांडे. या दोन सख्ख्या बहिणी सध्या मराठी इंडस्ट्री गाजवत असून त्यांनी इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख टिकवून ठेवली आहे. या दोन बहिणी सतत एकमेकांची मजा घेत असतात आणि एकमेकांचे मजेशीर रील्स पोस्ट करत असतात. आज सुद्धा मृण्मयीने एक धमाल विडिओ शेअर केला आहे ज्याची बरीच चर्चा होताना दिसत आहे. मृण्मयी आणि गौतमी यांचं नातं खूप खास आहे. या दोघी बहिणी एकमेकांची फजिती करायची एकही संधी सोडत नाहीत. सध्या त्यांनी एक नवा कार्यक्रम सुरु केला आहे ज्यात मोठी बहीण वर्सर्स लहान बहीण असे एकमेकांबद्दलच्या गोड तक्रारी त्या रील्सच्या माध्यमातून मांडत असतात. त्यांच्या या रील्सना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यात मृण्मयी गौतमीचे किस्से सांगून तिला तोंडावर पाडते तर गौतमी सुद्धा मागे न हटता मृण्मयीची फजिती करते. असाच एक विडिओ नुकताच मृणमयीने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघीही बहिणी व्यायाम करताना दिसत आहेत. व्यायामातील उड्या   मारण्याचा प्रकार वन लेग स्किपींग करताना दोघी दिसत आहेत. मात्र गौतमीकडे बघून एखादा घोडा उसळल्यावर जश्या उड्या मारतो तास भास होत आहे. मृण्मयीने सुद्धा या धमाल व्हिडिओला कमाल कॅप्शन देत असं लिहिलं आहे, “माझी लाडकी बहीण…. @gautamideshpandeofficialघोड्या सारख्या उड्या 😂😂😂😂याला one leg skipping म्हणतात.. @anuj.shelke” आता आंतरराष्ट्रीय योग दिवस नजीक आला असल्याने त्याची तयारी म्हणून हा भलताच व्यायाम गौतमी करताना दिसत आहे. गौतमीला अजिबात नृत्य करता येत नाही हे मृण्मयीने अनेक मुलाखतीत सांगितलं आहे. गौतमी अभिनेत्री सोबत एक उत्तम गायिका आहे. गौतमीचा हा भन्नाट नाच पाहून अनेकांना शक्तिमानच्या नाचाची आठवण झाली आहे.

संबंधित बातम्या

त्यांच्या ट्रेनरने सुद्धा मृण्मयीच्या या व्हिडिओवर कमेंट करत गौतमीला ‘लंगडा शक्तिमान’ असं मजेत म्हटलं आहे. एका मोठ्या आणि लहान बहिणीच्या आयुष्यात रोज घडणाऱ्या गोष्टी अगदी कँडिड moments सुद्धा या दोन अभिनेत्री शेअर करायला विसरत नाहीत. हे ही वाचा-  सई आणि ललित यांचे ‘कार’नामे, पाहा बंद गाडीमध्ये काय करतात सेलेब्स? एवढी मजा मस्ती करत असताना त्या दोघींचं एकमेकींवर खूप प्रेम आहे. मृण्मयी आणि गौतमी जितक्या चांगल्या बहिणी आहेत तितक्याच चांगल्या मैत्रिणीसुद्धा आहेत. भलेही त्या एकमेकांना चिडवण्याची एकही संधी सोडत नसल्या तरीही त्यांचं प्रेम हे जगजाहीर आहे.  त्यांच्या या नात्याचं चाहते सुद्धा कायमच कौतुक करत आले आहेत. त्यांच्या या क्युट व्हिडिओला खूप सुंदर प्रतिसाद मिळतो आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या