JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Ranveer Singh च्या न्यूड फोटो शूटबद्दल राजा रवि वर्माचं नाव घेत मिलिंद सोमण काय म्हणाला पाहा

Ranveer Singh च्या न्यूड फोटो शूटबद्दल राजा रवि वर्माचं नाव घेत मिलिंद सोमण काय म्हणाला पाहा

अभिनेता रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. मात्र 27 वर्षांपूर्वी मिलिंद सोमणने देखील असंच न्यूड फोटोशूट केलं होतं. रणवीर सिंहच्या फोटोशूट प्रकरणी मिलिंद सोमणची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जुलै:  बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. न्यूड फोटोशूटमुळे अभिनेता चांगलाच चर्चेत आला आहे.  सोशल मीडियावर हे फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं आहे.  या प्रकरणात रणवीर विरोधात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याच्या अटकेची मागणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान आलिया भट्ट, अर्जुन कपूर, दीपिका पादुकोण, राम गोपाल वर्मासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी रणवीरला पाठिंबा दिला आहे. अशातच मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणीची प्रतिक्रीया देखील समोर आली आहे. रणवीर सिंहच्या न्यूड फोटो शूटबद्दल राजा रवि वर्मा यांचं नाव घेत मिलिंदनं ट्विट केलं आहे. काय म्हणाला मिलिंद सोमण पाहा. मिलिंद सोमणनी रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूट प्रकरणात आपली प्रतिक्रिया देत ट्विट केलं आहे. न्यूड फोटोंमुळे ट्रोल होणाऱ्या रणवीला पाठिंबा देत भावना व्यक्त केल्या आहेत.  मिलिंदनं ट्विटरकरत म्हटलंय, ‘जगात लोकांची अनेक मत आहेत. तुम्ही कोणाचं ऐकाल’. तर पुढच्या ट्विटमध्ये मिलिंदनी राजा रविवर्माच्या काळापासून गोष्टी थोड्या बदलल्या आहेत, असं म्हटलं आहे. राजा रवि वर्मा हे भारतीय इतिसातील महान कलाकार आणि चित्रकार होते. हेही वाचा - Ranveer Singh : रणवीर सिंहचं वादग्रस्त न्यूड फोटोशूट कुणी आणि कुठे केलं? समोर आल्या डिटेल्स भारतीय कलेच्या इतिहासातील हे फार मोठं नावं आहे. राजा रवि वर्मा यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक देवांच्या पौराणिक कथांची चित्र काढून ती लोकांपर्यंत पोहोचवली.  त्याचप्रमाणे राजा रवि वर्मा पौराणिक कथेप्रमाणेच न्यूड चित्रांसाठीही चर्चेत होते. त्यांच्यावरही अनेकदा टीका करण्यात आल्या आहेत. याचाच दाखला देत मिलिंद सोमणनी राजा रवि वर्मा यांचं उदाहरण आपल्या ट्विटमध्ये दिलं आहे.  दरम्यान मिलिंद सोमणनी ट्विटमध्ये रणवीरचं नाव न घेता पाठिंबा दर्शवला आहे.

मिलिंद सोमण पहिला बॉलिवूड अभिनेता होता ज्यानं पहिल्यांदा न्यूड फोटोशूट केलं होतं. 1955 साली त्यानं गर्लफ्रेंड मधुबरोबर हे फोटोशूट केलं होतं.  त्यावेळीही मिलिंदच्या न्यूड फोटोशूटची प्रचंड चर्चा झाली होती. अनेकांनी त्याच्यावर टिका देखील केली होती.  मिलिंदनं त्याचं पहिलं न्यूड फोटोशूट हे एका श्यूज ब्रँडसाठी केलं होतं.  प्रबुध्दा दासगुप्ता यांनी मिलिंदचे हे फोटो काढले होते. या फोटोची देशभरात चर्चा झाली होती. एकदा नाही दोन वेळा मिलिंद सोमणनं न्यूड फोटोशूट केलं आहे. 2020मध्ये मिलिंदचा 55वा वाढदिवस साजरा झाला. त्या दिवशी त्यानं त्याचं न्यूड फोटोशूट केलं होतं. हे फोटो त्याची पत्नी अंकिता कोंवर हिनं काढले होते असं म्हटलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या