JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / mazhi tuzhi reshimgaath: 'शेफाली' म्हणते 'माझ्यासाठी हा टर्निंग पॉईंट'

mazhi tuzhi reshimgaath: 'शेफाली' म्हणते 'माझ्यासाठी हा टर्निंग पॉईंट'

सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (mazhi tuzhi reshimgaath) ही मालिका चांगलीच गाजत आहे. त्यामधील श्रेयस आणि प्रार्थनाची जोडी आणि छोटी परी हिची चर्चा घराघरात होत आहे. पण शेफालीची व्यक्तिरेखाही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 सप्टेंबर: सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Maji Tuzi Reshimgath) ही मालिका चांगलीच गाजत आहे. त्यामधील श्रेयस आणि प्रार्थनाची जोडी आणि छोटी परी हिची चर्चा घराघरात होत आहे. मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांची फौज आहे. यासोबत सध्या मालिकेत शेफालीची (Shefali ) व्यक्तिरेखा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नेहाची कलीग आणि जवळची मैत्रीण शेफाली हिची भूमिका अभिनेत्री काजल (kajal kate ) अगदी चोख बजावत **(Maji Tuzi Reshimghat Latest Update)**असल्याचे दिसून येत आहे. प्रेक्षकांकडून देखील तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. शफालीच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना काजल म्हणाली, “शेफाली ही माझ्यासारखीच आहे. आनंदी, सगळ्यांना हसवत असणारी काहीशी अल्लड अशी मी सुद्धा आहे. त्यामुळे शेफाली माझ्या फार जवळची आहे आणि ती साकारताना मला खूप मजा येते. शेफाली म्हंटल की माझ्या डोळ्यासमोर ‘कभी ख़ुशी कभी गम’ चित्रपटातील ‘काजोल’ आणि ‘जब वी मेट मधली करीना कपूरची भूमिका येत असल्याचे तिने सांगितले. या दोघींचं मिश्रण म्हणजे शेफाली आहे. शेफाली हे खूप एनर्जेटिक कॅरेक्टर आहे. त्यामुळे सेटवरही मला सतत एनर्जेटिक राहावं लागतं.

प्रेक्षकांकडून शेफालीला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल बोलताना काजल म्हणाली, “शेफाली माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली आहे. शेफालीने माझं आयुष्य बदलून टाकलंय. मला आज लोकं ओळखायला लागली आहेत. आता मी सुद्धा काहीसा शेफालीप्रमाणे विचार करायला लागले आहे. त्यामुळे मीच स्वतः शेफालीच्या प्रेमात आहे. तिच्यावर प्रेक्षक ही खूप प्रेम करतात. वाचा : Bigg Boss Marathi: मीरा आणि स्नेहामध्ये जेवणावरून तुफान राडा; तर दुसरीकडे सोनाली होणार भावुक मला मेसेजेस, फोनद्वारे लोकं आवर्जून प्रतिक्रिया कळवतात. शेफाली सारखी आमच्या आयुष्यात एक तरी मैत्रीण असावी अशी प्रतिक्रिया जेव्हा मला मिळाली तेव्हा मला खूप आनंद झाला असल्याचे तिने सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या