मुंबई 08 ऑगस्ट: ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरने सुरु झालेला वाद शांत झाल्याचा काहीच दिवसात अजून एका सिनेमाच्या पोस्टरने नव्या वादाला सुरुवात केल्याचं समोर आलं आहे. ‘मासूम सवाल’ असं या सिनेमाचं नाव असून सिनेमाच्या पोस्टरमुळे सध्या खळबळ माजल्याचं दिसत आहे. या पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा दावा सुद्धा अनेकांनी केला आहे. काय आहे प्रकरण? मासूम सवाल या सिनेमाच्या पोस्टरवर एका सॅनिटरी पॅडवर श्रीकृष्णचा फोटो लावल्याचं दिसून आलं आहे. या फोटोमुळे सिनेमाच्या दिग्दर्शकांविरुद्ध उत्तर प्रदेशातील पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली आहे. सिनेमाचे दिग्दर्शक संतोष उपाध्याय आणि टीमच्या विरोधात हिंदू राष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रेसिडेंट यांनी तक्रार दाखल केली आहे. उत्तर प्रदेशात काही सिनेमागृहाबाहेर निदर्शनं सुद्धा झाल्याचं समोर आलं आहे. ज्या ज्या सिनेमागृहात या सिनेमाचं स्क्रीनिंग होतं त्यातील काही सिनेमागृहाबाहेर निदर्शनं करण्यात आली आहेत असं समोर येत आहे. संतोष उपाध्याय यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट मासिक पाळीशी निगडित समाजात असणारी शरम आणि गैरसमज यावर भाष्य करणारा सिनेमा आहे. हा सिनेमा 5 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. हे ही वाचा- Sonalee Kulkarni: महाराष्ट्राच्या अप्सरेचं लंडनमध्ये लग्न; सोनाली-कुणालच्या वेडिंग स्टोरीचा ट्रेलर आला समोर याबद्दल सिनेमाचे दिग्दर्शक यांनी आपलं मत मांडलं आहे. ‘कधीकधी आपण केवळ एकाच नजरेने एखाद्या गोष्टीकडे पाहतो म्हणून गौरसमज होण्याची शक्यता असते. हा सिनेमा मासिक पाळीवर आधारित आहे त्यामुळे पॅड दाखवणं अनिवार्य आहे. त्यामुळे सिनेमाच्या पोस्टरवर पॅड आहे पण पॅडवर श्रीकृष्ण नाहीत. या गैरसमजामुळे आमच्या प्रमोशनला हवा तास पाठिंबा मिळत नाहीये.”
सिनेमाचा विषय हा एक टॅबू मोडून काढणं हा आहे. याबद्दल सिनेमातील इतर कलाकार सुद्धा आपलं मत व्यक्त करताना दिसत आहेत. ट्विटरवर सुद्धा या सिनेमाला बॉयकॉट करण्याचे ट्विट्स समोर येत आहेत. काली या माहितीपटाच्या पोस्टरने सुद्धा अशाच एका वादाला सुरुवात केली होती. या माहितीपटाच्या पोस्टरवर काळजी मातेच्या हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात समलैंगिक समाजाचा झेंडा असल्याचं दाखवण्यात आलेलं ज्यावरून सिनेमाच्या निर्मात्या लीना यांच्यावर जबर टीका झाली होती.