JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / दोन घटस्फोट झालेली अभिनेत्री स्नेहा वाघ रिलेशनशिपबाबत म्हणते...

दोन घटस्फोट झालेली अभिनेत्री स्नेहा वाघ रिलेशनशिपबाबत म्हणते...

वैवाहिक आयुष्य आणि लव्हलाईफबाबतही स्नेहाने बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात अनेक खुलासे केले होते. आता पुन्हा स्नेहानं प्रेम आणि रिलेशनशिपबद्दल भाष्य केले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 मार्च- बिग बॉस फेम मराठी अभिनेत्री नेहा वाघ सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. ती तिच्या रिल आणि रिअल लाईफमुळेही चर्चेत असते. वैवाहिक आयुष्य आणि लव्हलाईफबाबतही स्नेहाने बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात अनेक खुलासे केले होते. आता पुन्हा स्नेहानं प्रेम आणि रिलेशनशिपबद्दल भाष्य केले आहे. स्नेहाने नुकतेच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन घेतले. यावेळी चाहत्यांनी तिला मालिकेबाबत आणि खासगी आयुष्याबाबतही प्रश्न विचारले. चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना नेहाने प्रेमाबद्दल भाष्य केले आहे. स्नेहा वाघला एका चाहत्याने प्रेम आणि रिलेशनशिपबद्दल तुझं काय मत आहे, असे विचारले. यावर ती म्हणाली, “प्रेम आणि रिलेशनशिप या गोष्टी त्या त्या माणसाशी निगडीत असतात. मी त्याबद्दल काय विचार करते हे सांगू शकत नाही. मी याबद्दल काय उत्तर देऊ हेच मला आता समजत नाही. मी जशी आहे तशी फार आनंदात आहे.” वाचा- …म्हणून रणबीर कपूर आहे सोशल मीडियापासून दूर; आलियाच्या पतीने सांगितलं कारण दरम्यान, अभिनेत्री स्नेहा वाघचा विवाह अगदी कमी वयात झाला होता. वयाच्या १९ व्या वर्षी तिने अविष्कार दर्व्हेकरबरोबर लग्नगाठ बांधली होती. मात्र स्नेहाने अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आणि काही वर्षातच ते विभक्त झाले. स्नेहाने एका मुलाखतीत तिला घरगुती हिंसाचाराला सामोरं जावं लागल्याचं सांगितलं होतं. तसेच तिने तो काळ तिच्यासाठी फार कठीण होता, असा खुलासाही केला होता. वाचा- ‘पडदा आणि ड्रेस एक सारखाच..’ नेटकऱ्याच्या कमेंटवर सईचं सडेतोड उत्तर स्नेहाचा जन्म मुंबईत कल्याण येथे झाला. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. वयाच्या 13 व्या वर्षापासून तिने मराठी नाटकांमध्ये काम करणं सुरू केलं. ‘अधुरी एक कहाणी’ या मराठी मालिकेत तिने महत्त्वपूर्ण भूमिका केली होती. त्यानंतर तिने हिंदी सिनेसृष्टीवर आपलं लक्ष केंद्रित केलं. इमॅजिन टीव्हीवरच्या ‘ज्योती’ या शोमुळे स्नेहा प्रसिद्धीच्या झोतात आली. या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारत होती. त्यानंतर ‘चंद्रगुप्त मौर्य’ या मालिकेत तिनं ‘मूरा’ हे पात्र साकारलं. त्यानंतर `वीरा` या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसली.

संबंधित बातम्या

वयाच्या 19व्या वर्षी अभिनेता आविष्कार दारव्हेकरसोबत तिचा विवाह झाला; मात्र या नात्यात तिला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागलं, असं बोललं जातं. त्यानंतर तिने पहिल्या पतीपासून घटस्फोट (Divorce)घेतला. 2015 मध्ये स्नेहानं इंटीरिअर डिझायनर अनुराग सोळंकीसोबत दुसरं लग्न केलं; मात्र हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर 8 महिन्यांतच ती त्याच्यापासून वेगळी झाली.

याशिवाय स्नेहाचं नच बलिए 9 चा स्पर्धक राहिलेल्या फैजल खानसोबत अफेअर असल्याचीही चर्चा रंगली होती. फैजल तिच्यापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. पण दोघांनीही ही अफवा असल्याचं म्हणत हे वृत्त फेटाळलं होतं. ली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या