varsha usgaonkar
मुंबई, 21 मार्च : ‘मी आले निघाले’, ‘चोरीचा मामला’, ‘मनमोहना तू राजा स्वप्नातला’ सारख्या गाण्यांची सुरेख नायिका म्हणजे मराठमोळी अभिनेत्री वर्षा उसगावकर. 80 आणि 90च्या दशकात मराठी सिनेमातील एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून वर्षा उसगावकर यांचं नाव समोर येतं. मराठी, हिंदी नाटक तसेच सिनेमा आणि आता मालिकेतून वर्षा उसगावकर यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मूळच्या गोव्याच्या असलेल्या वर्षा उसगावकर यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत आपली नवी ओळख निर्माण केली. सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे सारख्या दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी स्क्रिन शेअर करत प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं. पण तुम्हाला माहिती आहे का, अनेक वर्ष मराठी सिनेसृष्टी आणि लाखो प्रेक्षकांच्या गळ्याती ताईत असलेल्या वर्षा उसगावकर यांना वयाच्या 55 व्या वर्षी सर्वोत्कृष्ट सासू पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. वर्षा उसगावकर यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1968 साली गोव्यात झाल्या. त्यांची कोंकणी भाषा फारच उत्तम आहे. त्यांनी लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे नाट्यशास्त्राचं शिक्षण देखील घेतलं आहे. सडपातळ, सुंदर, देखणी, ग्लॅमरस आणि अभिनयाची योग्य जाण असणाऱ्या अभिनेत्रींपैकी वर्षा उसगावकर या एक आहेत. हेही वाचा - श्रीवल्लीला पाहून श्रेयस तळपदे फिदा! मराठमोळ्या पुष्पासोबत रश्मिकाचा खुल्लमखुल्ला रोमान्स सचिन पिळगावकर अशोक सराफ या जोडगोडीबरोबर ‘गंमत जंमत’ या सिनेमातून वर्षा उसगावकर यांनी पदार्पण केलं. ‘गंमत जंमत’ या निखळ निवोदी सिनेमानं वर्षा उसगावकर यांच्यासारखी नवोदित आणि टॅलेंटेड अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीला दिली. वर्षा उसगावकर यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत 45हून अधिक मराठी सिनेमे तर 6हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. त्याचप्रमाणे दूरदर्शनवरील महाभारत या मालिकेतही त्यांनी काम केलं.
वर्षा उसगावकर या सध्या स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत काम करत आहेत. मालिकेत त्यांनी साकारलेली नंदिनी ही भूमिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. वयाच्या 55व्या वर्षी देखील वर्षा उसगावकर यांचं सौंदर्य कायम आहे. एखाद्या वीशीतील मुलीप्रमाणे त्या सुंदर आणि तितक्याच ग्लॅमरस दिसतात. मालिकेतील कोल्हापूरी बोलणारी तीन मुलांची आई आणि सासू वर्षा उसगावकर यांनी उत्तमरित्या साकारली आहे. नंदिनी या भूमिकेसाठी वर्षा उसगावकर यांना नुकताच स्टार प्रवाह पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट सासू हा मिळाला.
वर्षा उसगावकर यांना ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट सासूचा पुरस्कार मिळताच त्यांनी खास फोटो आणि पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटलंय, “मला 2023ची सर्वोत्कृष्ट सासू बनवल्याबद्दल सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत नंदिनीची भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल स्टार प्रवाह आणि महेश कोठारे यांची मी खूप खूप आभारी आहे”.