JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शर्मिष्ठा राऊतनं केला डोक्यावरचा भार कमी, फोटो पाहून येईल कारण लक्षात!

शर्मिष्ठा राऊतनं केला डोक्यावरचा भार कमी, फोटो पाहून येईल कारण लक्षात!

नुकतीच अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतनं तिचे काही फोटो शेअर केले आहे. या फोटोत ती नवीन लूकमध्ये दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 फेब्रुवारी- अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल ती माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच तिनं तिचे काही फोटो शेअर केले आहे. या फोटोत ती नवीन लूकमध्ये दिसत आहे. तिनं नवीन हेअरकट केला आहे. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतनं इन्स्टावर तिचे नवीन हेअरकटमधील काही फोटो शेअर केले आहेत. यासोबतच तिन एक पोस्ट देखील केली आहे. तिनं म्हटलं आहे की, My new haircut 😊😊.. डोक्यावरचा कामाचा भार कमी होत नाहिये तर म्हटल डोक्यावरचा केसांचा भार थोडासा कमी कराव।😜😜.. चाहत्यांनी देखील शर्मिष्ठा राऊतचा न्यू हेअरकट आवडला आहे. कमेंट करत चाहत्यांनी याला पसंती दिली आहे. वाचा- ‘सच्च्या शिवभक्ताला कुठलीबी लढाई..’, शिवजयंतीला किरण मानेंची ‘ती’ पोस्ट VIRAL मन उधाण वाऱ्याचे या मालिकेतून पदार्पण करणारी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.शर्मिष्ठानं रेशीमगाठी मालिकेतूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर बिग बॉसमध्येही ती उत्तम खेळली.

संबंधित बातम्या

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आता स्वत:चं प्रोडक्शन हाऊस सुरू करत आहे. या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून ती मराठी मालिकांची निर्मिती करणार आहे.मालिका सोडली असली तरी शर्मिष्ठा आता मालिकेची निर्मिती करताना दिसणार आहे. तिच्या या नव्या सुरूवातीत तिला तिचा नवरा तेजस देसाई देखील मदत करणार आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अभिनेत्री त्यांचे डेली रूटींग असेल किंवा नवीन हेअरकट, शॉपिंग याबद्दल माहिती शेअर करत असतात. चाहते देखील याला चांगला प्रतिसाद देताना दिसतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या