मुंबई, 22 मे- मराठी अभिनेत्री(Marathi Actress) प्रिया बापटच्या(Priya Bapat) खास अंदाजाने नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधतं. प्रियाच्या प्रत्येक हालचालीवर चाहत्यांचं विशेष लक्ष असतं. प्रिया बापटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर व्हिडीओ शेयर (Instagram Video) केला आहे. यामध्ये ती ‘टेक मी होम’ या गाण्याचं आनंद घेत आपल्या केसांशी खेळत आहे. प्रियाचा हा अंदाज चाहत्यांना भलताच आवडलेला दिसत आहे. एका युजरने तर कमेंट करत ‘एकीकडे तू आणि दुसरीकडे नोरा’ असं म्हटलं आहे. मराठमोळी अभिनेत्री नेहमीचं आपल्या गोड स्वभावाने चाहत्यांचं मन जिंकते. प्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. ती सतत आपल्या अपडेट चाहत्यांशी शेयर करत असते. आणि चाहतेही तिला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवत असतात. सोशल मीडियावर बरेच प्रियाला फॉलो करतात. आणि तिच्या प्रत्येक पोस्टचा भरभरून आनंद घेतात.
नुकताच प्रियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती ‘टेक मी होम’ गाणं एन्जॉय करत आहे. आणि आपल्या केसांशी सुद्धा खेळत आहे. प्रियाचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना खूप पसंत पडत आहे. प्रियाने यामध्ये निळ्या रंगाचा डेनिम घातला आहे. चाहते या व्हिडीओवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत. (हे वाचा: सामान्य मुलगी कशी झाली बिग बॉसची विजेती? पाहा मेघा धाडेचा अविश्वसनीय प्रवास ) एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे, एकीकडे नोरा आणि दुसरीकडे तू’ नोरा सध्या बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आह तिने आपल्या डान्सने तरुणांना वेड लावलं आहे. तर दुसऱ्या युजरने कमेंट करत प्रियाच्या स्माईलचं कौतुक केलं आहे. तर काहींनी प्रियाच्या सुंदर केसांचं आणि डेनिमच कौतुक केलं आहे. (हे वाचा: बापरे! तब्बल 18 मीनिटे मधमाश्यांसोबत शुट केलं अभिनेत्रीने,Video पाहून तुम्हीही.. ) प्रिया ही मराठीतील उत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रिया आपला पती आणि अभिनेता उमेश कामात सोबत विविध उपक्रम करताना दिसून येते. ती सतत आपल्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असते.