मुंबई, 17 मार्च- बिग बॉस मराठा **(bigg boss marathi 3 )**फेम उत्कर्ष शिंदे (utkarsh shinde ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. तो त्याच्या आगामी प्रोजक्टबद्दल माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकताच उत्कर्ष शिंदेने एक फोटो शेअर केला आहे. उत्कर्ष शिंदेची नुकतीच ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले **(vijay gokhale )**यांच्यासोबत भेट झाली. या भेटीबद्दलचा अनुभव त्याने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून लिहिला आहे. उत्कर्ष शिंदेने अभिनेते विजय गोखले यांच्यासोबतच्या भेटीच्या फोटो शेअर करत म्हटलं आहे की, मोठे कलाकार मोठे का असतात त्याचे एक उत्तम उदाहरण…“विजय गोखले नाम हि काफी है “. उमदा नट ,दिग्दर्शक भल्या मोठ्या ख्यातीचे व्यक्तिमत्व, तितकेच साधे राहणीमान व प्रेमळ आणि आपुलकीचे बोलणे. त्यांची भेट एका कार्यक्रमात झाली आणि त्यांच्या तोंडून माझे कौतुक ऐकून खूप छान वाटले. माझ्या घरातल्या सर्व सदस्यांना तू खूप आवड्लास म्हणत त्यांनी बिग बॉसमधले कैक एपिसोडच्या आठवणी ताज्या करून दिल्या. पुढील वाटचालीस थोडक्यात मार्गदर्शन करत भरभरून आशीर्वाद देत कौतुकांचा वर्षाव केला त्याबद्दल आभार मानावे तितके कमीच आहेत .
विजय गोखले सर खूप खूप छान प्रोजेक्ट्स उत्तम कलाकृती अशीच तुमच्या कडून घडू द्या आणि आम्हा नवनवीन मुलांना असेच मार्गदर्शन देत राहा . #उत्कर्षशिंदे #शिंदेशाही #बिगबॉस.. वाचा- सचित पाटीलची पत्नी आहे गायिका, मराठीसोबत भोजपूरीमध्ये उमठवलाय ठसा यंदा बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन सुपरहिट ठकला. प्रेत्येक स्पर्धाकाच्या खेळाचे कौतुर झाले. या सगळ्या त सर्वांचे लक्षवेधून घेतले ते उत्कर्ष शिंदेने. उत्कर्ष शिंदे घरात असा एक स्पर्धक होता जो ऑलराऊंडर म्हणून ओळखला जात होता. त्याच्या आणि जय मैत्रिचे देखील प्रेक्षकांकडून कौतुर झाले. आता त्याचे नवीन काही प्रोजेक्टस येणार आहेत.