मुंबई, 2 एप्रिल- मालिकेच्या शेटवर असेल किंवा नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोचण्यासाठी कलाकार अनेकवेळा लोकलचा प्रवास (mumbai local) करत असतात. मध्यंतरी अभिनेत्री प्रिया बापट हिनं देखील नाटकाच्या प्रयोगाला पोहचण्यासाठी मुंबई लोकलानं (local journey ) प्रवास केला होता. आता आणखी एक अभिनेत्यानं वेळेत नाटकाच्या प्रयोगाला पोहचण्यासाठी मुंबई लोकलनं प्रवास केला. त्याच्या तोंडाला मास्क असल्याने त्याला कोणी ओळखलं नाही. मात्र ओळखलं असतं तर अवघड झालं आसतं. अभिनेता सागर कारंडे (Saagar Karande) याने प्रयोगाची नाटकाच्या प्रयोगाल वेळेत पोहोचण्यासाठी मुंबई लोकलच्या गर्दीतून प्रवास करत नाट्यगृह गाठले. त्याने इन्स्टावर फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिलं आहे. सागरनं फोटो शेअर करत म्हटलं आहे की, नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहचण्यासाठी लोकल ने प्रवास… वाचा- पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केदार शिंदेंची मोठी घोषणा, ‘जत्रा 2’ बाबत मोठी अपडेट चला हवा येऊ द्या या शोमधून घराघरात पोहोचलेला सागर कारंडेने नेहमीच प्रेक्षकांना भरभरून हसवलं. सागरने सादर केलेल्या अनेक व्यक्तिरेखा, पात्र ही सागरच्या वैविध्यपूर्ण अभिनयाने जिवंत झाली आहेत. विनोदाचे अचूक टायमिंग साधलेल्या सागरकडे केवळ प्रेक्षकांना हसवण्याचीच किल्ली नाही, तर टचकन डोळ्यात पाणी आणण्याचे सामर्थ्यही आहे. हे त्याच्या पोस्टमन या व्यक्तिरेखेने दाखवून दिले आहे. हीच तर फॅमिलीची गंमत (hich tar familychi gammat aahe) आहे या नाटकात सागर सध्या काम करत आहे. या नाटकाच्या प्रयोगाला पोहोचण्यासाठी सागरनं लोकलमधून प्रवास केला. रसिक प्रेक्षकांसाठी कलाकार काहीही करायला तयार असतात. चाहत्यांकडून देखील त्याचे यासाठी कौतुक होत आहे. अनेकांनी कमेंट करत त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे.
चला हवा येऊ द्या या शोमधून सागर कारंडेने नेहमीच प्रेक्षकांना भरभरून हसवलं. सागर कारंडे अभिनयासोबत उत्तम लेखक देखील आहे. जलसा, एक तारा,फक्त लढ म्हणा, बायोपिक्स यासारख्या सिनेमातूनही सागरने अभिनयाची चुणूक दाखवली आहे.