JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Manoj Muntashir: अखेर आदिपुरुष'च्या लेखकांनी हात जोडून मागितली माफी; नेटकरी म्हणाले 'तुम्ही संधीसाधू...'

Manoj Muntashir: अखेर आदिपुरुष'च्या लेखकांनी हात जोडून मागितली माफी; नेटकरी म्हणाले 'तुम्ही संधीसाधू...'

आदिपुरुषचा वाद वाढल्यानंतर चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे वाद अजून चिघळला. त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. मात्र आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एवढ्या दिवसांनी संवाद लेखक मनोज मुंतशीर आता बदलताना दिसत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर प्रेक्षकांची हात जोडून माफी मागितली आहे.

जाहिरात

आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंतशीर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 जुलै :  प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे देशभर वाद निर्माण झाला. या चित्रपटाच्या वेशभूषा, संवाद आणि व्यक्तिरेखा सगळ्यावरूनच प्रेक्षक संतापले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकारांसोबतच लेखकांवर देखील आक्षेप घेतला गेला. चित्रपटाचा वाद वाढल्यानंतर चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे वाद अजून चिघळला. त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला. मात्र आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एवढ्या दिवसांनी संवाद लेखक मनोज मुंतशीर आता बदलताना दिसत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर प्रेक्षकांची हात जोडून माफी मागितली आहे. आतापर्यंत चित्रपटाच्या बचावात वक्तव्य करणाऱ्या मनोज यांनी आता माघार घेतली असून प्रेक्षकांची हात जोडून माफी मागितली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक ट्विट शेअर केले असून बंधू-भगिनी, वडीलधारी मंडळी, आदरणीय ऋषी-संत आणि श्री राम भक्तांची बिनशर्त माफी मागितली आहे. चित्रपटामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याचे त्यांनी मान्य केले. भगवान बजरंगबली सर्वांचे कल्याण करोत असे त्यांनी लिहिले. हे जाणून घ्यायचे आहे की यापूर्वी मनोजने हनुमानाबद्दल सांगितले होते की ते भक्त होते, आम्ही त्यांना देव बनवले होते. या विधानावर त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.

मनोज मुंतशीर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हे मी मान्य करतो. माझ्या सर्व बंधू-भगिनी, ज्येष्ठ, आदरणीय ऋषीमुनी आणि श्रीराम भक्तांची मी हात जोडून बिनशर्त माफी मागतो. भगवान बजरंगबली आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देवो, एकत्र आणि अतूट राहण्याची शक्ती देवो. तसेच आपल्या पवित्र, शाश्वत आणि महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य देवो!‘असं त्यांनी म्हटलं आहे. सनी देओल ते सलमान खान; बिग बीं आधी ‘या’ 12 अभिनेत्यांनी नाकारली होती ठाकूर भानू प्रतापची भूमिका; काय होतं कारण? मनोज मुंतशीर यांनी माफी मागितताच हे ट्विट व्हायरल झाले. त्यांच्या या ट्विटवर युजर्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले, ‘संवाद लिहिण्यापूर्वी विचार करायला हवा होता.’ दुसऱ्याने लिहिले, ‘तुम्ही संधीसाधू आहात.’ तर काहींनी ‘तुम्ही आमच्या माफीला पात्र नाही’ अशा  प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

याआधी मनोज मुंतशीर यांनी हनुमानजी हे देव नसून ते रामभक्त असल्याचे सांगत प्रेक्षकांचा रोष ओढवून घेतला होता. ते म्हणाले होते की, ‘हनुमानजी तर फक्त रामभक्त होते आपण त्यांना देव बनवलं.’ या विधानानंतर ते जनतेच्या निशाण्यावर आले होते. नंतर त्यांच्या जीवाला धोका असल्या कारणाने  त्यांना संरक्षणही मिळाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या