JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / टांझानियनातील भाऊ-बहिणीच्या गाण्याची PM मोदींना भुरळ, मन की बातमध्ये केलं कौतुक

टांझानियनातील भाऊ-बहिणीच्या गाण्याची PM मोदींना भुरळ, मन की बातमध्ये केलं कौतुक

बॉलिवूडमधील सुपरहिट गाणी आणि सिनेमातील डायलॉग्स लिपसिंक करणाऱ्या टांझानियातले भाऊ-बहीण किली पॉल (Kili Paul) आणि नीमा पॉल (Neema Paul) यांच्या व्हिडिओने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना देखील प्रभावित केलं आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 फेब्रुवारी- बॉलिवूडमधील सुपरहिट गाणी आणि सिनेमातील डायलॉग्स लिपसिंक करून टांझानियातले भाऊ-बहीण किली पॉल (Kili Paul) आणि नीमा पॉल (Neema Paul) सोशल मीडिया**(Social Media)** स्टार बनले आहेत. आता या भाऊ-बहिणीने आपल्या व्हिडिओने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना देखील प्रभावित केलं आहे. आज मक की बात या कार्यक्रमात त्यांनी या या भाऊ-बहिणीचे कौतुक केले. ते म्हणाले आहेत की, या दोघांनाही भारतीय संगीताची आवड आहे. भारतीय संगीताच्या त्यांच्या या आवडीमुळे ते खूप लोकप्रिय देखील झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात किली पॉल (Kili Paul) आणि नीमा पॉल (Neema Paul) यांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, आज मी तुमची दोन व्यक्तीसोंबत भेट घडवणार आहे. सध्या सोशल मीडियावर टांझानियातले भाऊ-बहीण किली पॉल (Kili Paul) आणि नीमा पॉल (Neema Paul) यांची चांगलीच चर्चा आहे. मला माहिती आहे की, तुम्ही देखील या दोघांनाविषयी ऐकले असेल. वाचा- ‘अरुंधतीवर प्रेम अन् अनिरुद्धचा तिरस्कार..वाईट वाटतं’ मिलिंद यांची पोस्ट चर्चेत किली-नीमा यांच्यात भारतीय संगीताची आवड पीएम मोदी म्हणाले की, त्यांना भारतीय संगीताची आवड आहे. म्हणूनच ते खूप लोकप्रिय आहेत. त्यांचे लिपसिंक पाहून याचा अंदाज येतो. यासाठी ते किती कष्ट घेत असतील हे देखील दिसून येते. वाचा- देवमाणूस 2 मालिकेत नवीन एंट्री, सोनू आहे सोशल मीडिया स्टार पीएम मोदी यांनी किल‍ी आणि नीमा यांचे केले कौतुक पीएम मोदी यावेळी म्हणाले की, नुकताच त्यांचा प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने आपलं भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ चा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. काही दिवसापूर्वी त्यांनी लतादीदी यांना देखील गाण्यातून श्रद्धांजल‍ी दिली होती.

संबंधित बातम्या

भारतीय उच्चायुक्तालयाने किली पॉलला केले होते सन्मानित काही दिवसापूर्वी टांझानियातील भारतीय उच्चायुक्तालयाने किली पॉल याला सन्मानित केलं होत. किली पॉल हा बॉलीवूड गाण्यावर लिपसिंक करून जगभरात प्रसिद्ध झाला आहे. सोशल मीडियावर त्याचे लाखो फॅन फॉलोअर्स आहेत. इतकेच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकार देखील या दोघांना सोशल मीडियावर फॉलो करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या