JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Raj Kaushal Death: मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Raj Kaushal Death: मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

राज कौशल एक निर्माता आणि स्टंट डायरेक्टर होते. त्यांनी दिग्दर्शक म्हणून देखील काम केलं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मंदिरा आणि दोन मुलं- वीर आणि तारा असा परिवार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जून: बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi Husband Died of Heart Attack) हिचे पती राज कौशल यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू (Raj Kaushal Death) झाल्याची माहिती मिळते आहे. बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी ही घटना घडली. उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. राज यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

राज यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. दिग्दर्शक-निर्माता ओनिर यांनी देखील जवळचा सहकाही गमावल्याचं दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट- My Brother Nikhil राज यांच्यासह केला होता, असं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

राज कौशल एक निर्माता आणि स्टंट डायरेक्टर होते. त्यांच्या पश्चात पत्नी मंदिरा आणि दोन मुलं- वीर आणि तारा असा परिवार आहे. राज यांनी ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी के लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. मुकूल आनंद यांच्या निवासस्थानी त्यांची आणि मंदिरा बेदी यांची पहिली भेट 1996 साली झाली होती. 14 फेब्रुवारी 1999 या दिवशी त्यांनी लग्न केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या