मुंबई, 05 मार्च : अभिनेत्री मलायका अरोरा अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर काही ना काही कारणानं नेहमीच चर्चेचा विषय ठरते. कधी ड्रेसिंग स्टाइल तर कधी अर्जुन कपूरसोबतचं अफेअर. पण यासोबतच तिच्या फिटनेसची सुद्धा सोशल मीडियावर खूप चर्चा होते. वयाच्या 46 व्या वर्षीही मलायकाचा फिटनेस कोणलाही लाजवेल असाच आहे. ती नेहमीच तिचे फिटनेस आणि योगाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही तिनं अशीच एक योगा पोस्ट तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. मलायकानं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक योगासनाचा फोटो शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मलायकाच्या या फोटोचं कौतुकही केलं जात आहे. हा फोटो शेअर करताना मलायकानं कॅप्शनमध्ये हँडस्टँड असं लिहिलं आहे. यासोबतच हे योगासन कसं करावं हेही तिनं या कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. ‘मी अद्याप जिवंत आहे ते केवळ तिच्यामुळेच’ अभिनेता इरफान खान झाला भावुक
कसं कराल मलायकानं लिहिलं, हे योगासन करण्यासाठी पहिल्यांदा जमिनीवर (पोटावर) झोपा. त्यानंतर तुमचे दोन्ही तळहात जमिनीवर पसरा. आता दोन्ही तळहातांच्या आधारे अधोमुख श्वानासन करा. त्यानंतर दोन्ही पाय हळूहळू वर उचलण्याचा प्रयत्न करा. लक्षात असू द्या की तुमच्या शरीराचा भार तुमच्या तळहातांवर राहिल. दोन्ही पाय पूर्णपणे वर घेतल्यावर हळूहळू ते बाजूला पसरवा. या दरम्यान दिर्घश्वास घ्या आणि सोडा. त्यानंतर पहिल्यादा उजवा आणि नंतर डावा पाय हळू हळू खाली आणा. त्यानंतर बलासनामध्ये काही काळ विश्रांती घ्या. या योगासनानं तुम्ही दिवसभर उत्साही राहता. नीना गुप्ताच्या मुलीनं घेतला घटस्फोट, पती होता बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता
फायदे हँडस्टँड योगा केल्यानं तुमच्या डोक्याला आणि मानेला होणारा रक्तपुरवठा सुरळित होतो. या योगासनानं मनाला तजेला मिळतो. तुमचा आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढते. मलायकाचा या पोस्टवर तिच्या चाहत्यांच्या कमेंटचा अक्षरशः पाऊस पडत आहे. फिटनेसच्या बाबतीत मलायका इतर अभिनेत्रींच्या तुलनेत खूपच पुढे आहे. ती नेहमीच तिचे फिटनेस व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ‘मी त्याचे पाय तोडले; आता चालणंही कठीण झालं आहे’, सैफशी भांडणाबाबत अजयचा खुलासा