JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मलायकाच्या बॉयफ्रेंडबद्दल मुलगा अरहानला काय वाटतं? अभिनेत्रीनं स्वतःच केला खुलासा

मलायकाच्या बॉयफ्रेंडबद्दल मुलगा अरहानला काय वाटतं? अभिनेत्रीनं स्वतःच केला खुलासा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉयफ्रेंड अर्जुन कपूरबद्दल मुलगा अरहानला काय वाटतं याचा खुलासा खुद्द मलायकानं केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 फेब्रुवारी : सध्या बी- टाउनमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या नात्याचीच सर्वात जास्त चर्चा आहे. मागच्या बऱ्याच काळापासून हे दोघं लग्न कधी करणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान एका मुलाखतीत अर्जुननं सध्या तरी लग्नाचा कोणताही विचार नाही आम्ही सध्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहोत मात्र जेव्हा लग्न करु तेव्हा सर्वांना नक्की सांगू असं म्हटलं होतं. त्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉयफ्रेंड अर्जुन कपूरबद्दल मुलगा अरहानला काय वाटतं याचा खुलासा खुद्द मलायकानं केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने अर्जुन आणि तिला मुलगा अरहानच्या नात्याबद्दलही सांगितलं. अरहानशी तिने या नात्याबद्दल मोकळेपणाने चर्चा केली असून तो या नात्याबद्दल खूश असल्याचं मलायका म्हणाली. याआधी मलायकाने अर्जुनच्या वाढदिवसाला दोघांचा रोमँटिक फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर मलायकाच्या वाढदिवसांलाही अर्जुननं तिच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. … आणि खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे डोळे आले भरून!

काही दिवसांपूर्वी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत मलायकाने घटस्फोटानंतर दुसऱ्यांदा प्रेम मिळवणं फार खास असल्याचं सांगितलं होतं. या मुलाखतीत मलायकाने ही एक कमाल फिलिंग असल्याचं मान्य केलं. जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हा मला माहीत नव्हतं की दुसऱ्यांदा मला नात्यात जायचं आहे की नाही. पण मला स्वतःला दुसरी संधी द्यायची होती. मी योग्य निर्णय घेतल्याचा मला आनंद आहे. असं ती म्हणाली होती. व्हॅलेंटाइन डेला मलायका अरोरानं शेअर केला VIDEO, हे खास काम करण्याचा दिला सल्ला

जाहिरात

यावेळी मलायकाने तिच्या आणि अर्जुनच्या वयातील अंतराबद्दलही आपलं मत स्पष्ट केलं. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा वयातल्या अंतराचा फारसा फरक पडत नाही. ही दोन व्यक्तिंच्या मनातली भावना असते. पण आपण अशा समाजात राहतो जिथे वयाने मोठा मुलगा लहान मुलीला डेट केलं तर चालतं पण मोठ्या वयाच्या मुलीने वयाने कमी असलेल्या मुलाला डेट केलं तर समाजाला पटत नाही. पण अशा लोकांमुळे माझ्यावर फारसा फरक पडत नाही असं मलायकानं म्हटलं होतं. VIDEO : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने अमृता फडणवीसांनी गायलं इंग्रजी गाणं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या