JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / या आजींबरोबरच्या फोटोमुळे मलायका झाली ट्रोल, युझर्स म्हणाले तुम्ही तर एकाच वयाच्या!

या आजींबरोबरच्या फोटोमुळे मलायका झाली ट्रोल, युझर्स म्हणाले तुम्ही तर एकाच वयाच्या!

काहीही न करता सर्वांचं लक्ष आपल्याकडे कसं वळवावं हे तिला चांगल्या प्रकारे कळतं. नुकताच तिचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक वयोवृद्ध आजीसोबत दिसते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 मे- बॉलिवूडची स्टायलिश मॉम मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. दरदिवशी तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. काहीही  न करता सर्वांचं लक्ष आपल्याकडे कसं वळवावं हे तिला चांगल्या प्रकारे कळतं. नुकताच तिचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक वयोवृद्ध आजीसोबत दिसते. मलायका आपल्या गाडीच्या दिशेने चालताना तिला एका बाजूला उभ्या असलेल्या आजी दिसतात. ती महिला मलायकाला काही बोलताना दिसते. मलायकाही तिचं ऐकून घेते आणि पुढे निघून जाते. पण जराशी पुढे गेल्यावर मलायका मागे वळते आणि त्या महिलेकडे जाऊन तिच्यासोबत फोटो काढते.मलायकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. श्रीदेवीचा विषय निघताच रडले बोनी कपूर VIDEO VIRAL

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युझर्स वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत आहेत. एका युझरने लिहिले की, ‘जर फोटोग्राफर समोर नसते तर मलायकाने तिला भावही दिला नसता.’ तर दुसऱ्या युझरने लिहिले की, ‘अरे ही तर तुझ्याच वयाची आहे. फक्त मेकओव्हरचा फरक आहे.’ एवढंच नाही तर अजून एका युझरने लिहिले की, ‘वृद्ध महिलेसोबत असं वागताना लाज वाटली नाही का. तुझ्याच वयाची आहे ती…’ गॅब्रिएलाच्या चेहऱ्यावर प्रेग्नसीचा ग्लो, अर्जुन रामपाल अशी घेतो काळजी हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मलायकाच्या विरुद्ध कमेंटचा भडीमार होताना दिसत आहे. मलायकाला ट्रोल करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. सर्वसामान्यपणे तिच्या प्रत्येक फोटोला आणि व्हिडिओला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. बॉलिवूड अभिनेत्रींना लाजवेल अशा शिकल्यात दाक्षिणात्य अभिनेत्री एकीकडे फिटनेससाठी मलायकाचं कौतुक केलं जातं तर स्टाइल स्टेटमेन्टसाठीही मोठ्या प्रमाणात तिला फॉलो केलं जातं. त्यामुळे मलायकाला पाठिंबा देणारेही बरेच आहेत. तिला पाठिंबा देणाऱ्यांपैकी एकाने लिहिले की, ‘मलायका फार दयाळू आहे. ती या वयोवृद्ध महिलेसोबत फार प्रेमाने बोलत आहे.’ तर दुसऱ्या एका युझरने कुतुहलापोटी ‘त्या दोघी एकमेकींशी नेमकं काय बोलत असतील?’ असा प्रश्न विचारला. दोघींच्या बोल्ड प्रणयदृश्यांचा व्हिडिओ व्हायरल; प्रिया बापटच्या ‘त्या’ सीनची चर्चा VIDEO VIRAL प्रियांका चोप्रा झाली सोफी टर्नरची ब्राइड्समेड; लग्नात केला धमाल डान्स

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या