JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Majhi Tujhi Reshimgath: नेहाला मिळणार वाढदिवसाचं धक्कादायक गिफ्ट; ड्रायव्हर काकाच अविनाश असल्याचं सत्य येणार समोर

Majhi Tujhi Reshimgath: नेहाला मिळणार वाढदिवसाचं धक्कादायक गिफ्ट; ड्रायव्हर काकाच अविनाश असल्याचं सत्य येणार समोर

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत आता नवा ट्विस्ट येणार आहे. इतके दिवस चेहरा लपवून बसलेला अविनाश अखेर नेहासमोर येणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जुलै: झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका गेल्या काही दिवसांपासून नव्या वळणावर आल्याचं पाहायला मिळत आहे. नेहा आणि यश यांचं लग्न झाल्यानंतर दोघांच्या आयुष्यात अनेक अडचणी येत आहेत. मात्र तरीही ते त्याला तोंड देऊन संसाराची गाडी रुळावर आणत आहे. मालिकेत काही दिवसांपूर्वीच नेहाच्या पहिल्या नवऱ्याची म्हणजेच अविनाशची एंट्री झाली आहे. अनेकदा नेहा आणि अविनाश एकमेकांसमोर येता येता राहिले आहेत. मालिकेत येणाऱ्या भागात नेहाचा वाढदिवस साजरा होणार आहे. याच दिवशी नेहाला वाढदिवसाचं मोठ आणि धक्कादायक गिफ्ट मिळणार आहे. कारण परीचा ड्रायव्हर काकाच अविनाश असल्याचं सत्य अखेर नेहासमोर येणार आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून नेहासमोर अविनाश सत्य समोर आल्याचं पाहायला मिळत आहे. आपण पाहिलं तर नेहा आणि यश यांच्या लग्नापासूनच अविनाश त्यांच्या आयुष्यात सतत डोकावण्याचा प्रयत्न करत आहे. नेहाच्या लग्नाच्या दिवशीही अविनाश तिच्या चाळीतील घरात पोहोचला होता. त्यानंतर त्यानं अचूक डाव साधून चौधरींच्या घरी परीच्या ड्रायव्हरची नोकरी मिळवली. हेही वाचा - Neha Shitole: ‘महेश मांजरेकर हा माणूस आयुष्यात नुसता..’, ‘BBM फेम नेहा शितोळेची पोस्ट चर्चेत .

संबंधित बातम्या

मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे, लग्नझाल्यानंतर चौधरींच्या घरातील नेहाचा पहिला वाढदिवस साजरा होत आहे. नेहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळे जण एकत्र आले आहेत. केक कापून झाल्यानंतर परी नेहाला आपण ड्रायव्हर काकांना केक देऊया का असं विचारते. त्यावर नेहा हो बोलताच परी नेहाला घेऊन ड्रायव्हरच्या रुमकडे जातात. तिथे परी तिच्या ड्रायव्हर काकांना हाक मारते तेव्हा अविनाश कोण आहे असं म्हणतो? त्यावर नेहा ‘मी परीची आहे’ आहे असं म्हणते. अविनाश दार उघडतो आणि नेहा समोर अखेर ड्रायव्हर काकांचा खरा चेहरा समोर येतो. अविनाशचं ड्रायव्हर बनून परीच्या आजूबाजूला फिरत आहे हे नेहा कळाल्यावर ती चांगलीच शॉक झाली आहे. आता मालिकेच्या येत्या भागात काय घडणार या कडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. ड्रायव्हर काकाच परीचा खरा बाबा आणि नेहाचा पहिला नवरा हे सत्य नेहा यशला सांगेल का?  त्याचप्रमाणे परी ज्याला ड्रायव्हर काका म्हणून ओळखत आहे तो तिचा खरा बाबा असल्याचं देखील परीला कळणार? या सगळ्या प्रश्नांची माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या