मुंबई 23 ऑगस्ट: प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही काळापासून ते युनिनरी ब्लायडर कॅन्सरमुळे (Bladder Cancer) त्रस्त होते. मात्र आजाराचं निदान होताच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची तब्येत आला स्थिर आहे. ते घरी परतले असून चाहत्यांनी काळजी करू नये मी लवकरच तंदुरूस्त होईन अशी विनंती त्यांनी आपल्या चाहत्यांना केली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार 10 दिवसांपूर्वी एच एन रिलायंस फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचं परिक्षण करून घेतलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना ब्लड कॅन्सर असल्याचं निदान केलं. त्यानंतर लगेचच त्यांचं ऑपरेशन झालं. अन् सध्या ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचार घेत आहेत. HBD: एक चापट आली अंगाशी; ‘त्या’ पब्लिसिटी स्टंटमुळे संपलं गौहरचं करिअर महेश मांजरेकर यांनी आतापर्यंत मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. मराठीतील अनेक लोकप्रिय आणि दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. आजघडीला मराठीतील एक प्रथितयश दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून महेश मांजरेकर यांचे नाव घेतले जाते. याशिवाय, बॉलीवूडमध्येही महेश मांजरेकर हे नाव सुपरिचित आहे. ‘वॉन्टेड’, ‘रेडी’, ‘दबंग’, ‘जिंदा’, ‘मुसाफिर’ आणि ‘काँटे’ यासारख्या लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच महेश मांजरेकर यांनी ‘व्हाईट’ या चित्रपटाची घोषणा केली होती.