मुंबई, 28 जुलै : हायवे, स्कॅम 1992 यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जाणारे निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक हंसल मेहता (Hansal Mehta) कायम चर्चेत असतात. याशिवाय त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानंही सन्मानीत करण्यात आलं आहे. हंसल मेहता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि खाजगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरतात. अशातच ते पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळी एका खास कारणामुळे ते चर्चेत आले आहेत. हंसल मेहता लवकरच महात्मा गांधींच्या जीवनावर आधारीत असलेल्या सीरिजचं दिग्दर्शन करणार आहेत. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत हंसल मेहतांनी याविषयी माहिती दिली आहे. या सेरीजसाठी ते आदित्य बिर्ला ग्रुपच्या अप्लॉज एंटरटेन्मेंटसोबत काम करणार आहेत. नुकतच अप्लॉज एंटरटेन्मेंटनं याविषयी घोषणा केली आहे. महात्मा गांधींच्या जीवनावर बनवल्या जाणाऱ्या सीरिज उल्लेखनिय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांनी लिहिलेल्या ‘गांधी बिफोर इंडिया’ आणि ‘गांधी-द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड’ या पुस्तकंवर आधारित असणार आहे. महात्मा गांधीच्या वेबसीरिजमध्ये प्रतिक गांधी हे मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
हंसल मेहता यांनी ही पोस्ट शेअर करत म्हटलं की, माझ्या 25 वर्षाच्या फिल्म मेकिंग आणि लेखकाच्या करिअरमध्ये ही एक मोठी जबाबदारी, एक मोठा विशेष अधिकार असणार आहे. याशिवाय माझ्या काही सर्वात आवडत्या सहकाऱ्यांसोबत पुन्हा एकत्र येण्याचा आनंद आहे. त्यामुळे हंसल मेहताही महात्मा गांधीच्या जीवनावर बनणाऱ्या सीरिजसाठी उत्सुक असेलेल दिसतायेत. या सेरिजचं तात्पुरतं नाव ‘गांधी’ असं ठेवण्यात आलं आहे. हेही वाचा - PHOTOS: ‘तेरा यह इश्क़ मेरा फ़ितूर ‘, कुणाच्या प्रेमात पडली प्राजक्ता माळी? दरम्यान, महात्मा गांधींच्या आयुष्यावर बनणाऱ्या या सीरिजविषयी समीर नायर यांनी म्हटलं की, महात्मा गांधींची कथा ही केवळ एका महान व्यक्तीची कथा नसून गांधींसोबत भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्राच्या जन्माची आणि इतर अनेक नाटककारांचीही ही कथा आहे. भारताची ही महत्त्वाची कथा सांगण्याची आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा समृद्ध इतिहास एका सखोल स्तरावर मांडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि यासाठी आम्हाला तितक्याच उंचीचा चित्रपट निर्माता हवा होता आणि हंसल मेहता आम्हाला भेटले.