JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Actors Fees : महाराष्ट्राची हास्यजत्रा की चला हवा येऊ द्या; कोणाला मिळतं सर्वाधिक मानधन?

Actors Fees : महाराष्ट्राची हास्यजत्रा की चला हवा येऊ द्या; कोणाला मिळतं सर्वाधिक मानधन?

महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि चला हवा येऊ द्या मधील कलाकारांचं मानधन किती? कोणाला मिळतं सर्वाधिक मानधन पाहा.

जाहिरात

कॉमेडी शोमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं मानधन किती?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जून :  गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन करणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या.  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो देखील टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय शोपैकी एक आहे. या शोच्या माध्यमातून अनेक कलाकार घराघरात पोहोचले आहेत. भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे आणि डॉ. निलेश साबळे, समीर चौघुले, गौरव मोरे, वनीता खरात, प्रसाद खांडेकर सारखे हे विनोदवीर गेली अनेक वर्ष  संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन करत आहेत. पण या कलाकारांना त्यांच्या कामाचे किती पैसे मिळतात याचा विचार कधी तुम्ही केलाय का? महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि चला हवा येऊ द्या मधील कलाकारांचं मानधन किती? तर सुरूवात करूया अभिनेत्री श्रेया बुगडेपासून. श्रेया ही हवा येऊ द्याच्या ग्रुपमधील पहिली महिला विनोदवीर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, श्रेया एका भागासाठी 80 हजार रूपये मानधन घेते. त्यानंतर पोस्टमन बनून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणारा अभिनेता सागर कारंडे एका भागासाठी 70 हजार रूपये मानधन घेतो. विनोदाचं कमाल टायमिंग असलेला भाऊ कदम एका भागासाठी 80 हजार रूपये मानधन स्वीकारतो. तर अभिनेते भारत गणेशपुरे यांना एका भागाचे 75 हजार रूपये मानधन मिळतं. अभिनेता कुशल बद्रिके देखील 70-80 हजार रुपये एका भागासाठी आकारतो. हेही वाचा -  श्रेया बुगडे घेते भाऊ अन् कुशलपेक्षा जास्त मानधन? हवा येऊ द्याच्या कलाकारांचं मानधन किती? चला हवा येऊ द्या कलाकारांचं मानधन तुम्हाला कळलं आता महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील विनोदवीर किती मानधन घेतात पाहूयात.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईची मुलगी शिवाली परबला एका एपिसोडसाठी 35 ते 37 हजार रुपये दिले जातात. रसिका वेंगुर्लेकरला या शोमध्ये एका एपिसोडसाठी 25 ते 30 हजार रुपये दिले जातात. वनिता खरातला एका एपिसोडसाठी 32 ते 35 हजार मानधन देण्यात येतं. अभिनेत्री नम्रता संभेरावला या कार्यक्रमात एका एपिसोडसाठी 30 ते 37 हजार रुपये दिले जातात.

तसंच आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने लोकांना वेड लावणाऱ्या अरुण कदम यांना एका एपिसोडसाठी 30 ते 35 हजार रुपये मानधन दिलं जातं. अभिनेता प्रसाद खांडेकरला एका एपिसोडसाठी तब्बल 40 ते 50 हजार दिले जातात. दुसरीकडे अभिनेते समीर चौगुले यांनासुद्धा 40 ते 50 हजार रुपये एका एपिसोडसाठी दिले जातात. फिल्टरपाड्याचा बच्चन अर्थातच अभिनेता गौरव मोरेला एका एपिसोडसाठी 40 ते 50 हजार रुपये मिळतात.  कलाकारांच्या मानधनातील मोठी बाब म्हणजे एखाद्या एपिसोडमध्ये एखाद्या कलाकारानं स्त्री वेश केला तर त्याला त्याचे 5 हजार अधिक मिळतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या