JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Lock Upp: 'Munawar Faruqui पासून दूर राहा', अंजली अरोराच्या आईचा लेकीला सल्ला

Lock Upp: 'Munawar Faruqui पासून दूर राहा', अंजली अरोराच्या आईचा लेकीला सल्ला

Lock Upp: आईला पाहून अंजली अरोराला आपले अश्रू आवरता आले नाहीत. आईला भेटल्यानंतर ती भावुक झाली. यावेळी अंजलीच्या आईने तिला काही खास सल्ला दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 एप्रिल: कंगना रणौतचा शो लॉक अप (Lock Upp) शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. लवकरच लॉक अपचा पहिला विजेता कोण असेल हे समजणार आहे. या शोमध्ये असलेल्या सर्व कैद्यांमध्ये अर्थात स्पर्धकांमध्ये पहिल्या दिवसापासून वाद-विवाद, प्रेम, भांडणं, मैत्री, वैर पाहायला मिळते आहे. मात्र अलीकडेच आलेला एपिसोड या सर्वच स्पर्धकांसाठी भावुक होता. कारण यावेळी स्पर्धकांचे कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींनी यामध्ये हजेरी लावली होती. यावेळी या शोमधील स्पर्धक अंजली अरोरा (Anjali Arora’s mother) हिची आई देखील आली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या मुलीला मुनव्वर फारूकीपासून  (Munawar Faruqui) दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. आईला पाहून अंजली अरोराला आपले अश्रू आवरता आले नाहीत. आईला भेटल्यानंतर ती भावुक झाली. अंजलीने तिच्या आईला विचारले की ती गेममध्ये जे काही करते आहे, ती स्क्रीनवर छान दिसते आहे का? यावर तिची आई म्हणते की तिने एकट्याने आपला खेळ खेळावा आणि कुणावरही विश्वास ठेवू नये. काय म्हणाली अंजलीची आई? अंजलीच्या आईने तिला समजावून सांगितले की, तुरुंगात कुणी कुणाचं सख्ख नाही आहे, सगळे खेळ खेळत आहेत. हे ऐकून अंजलीने विचारले, ‘मुनाव्वरही नाही?’ मुलीच्या प्रश्नावर तिच्या आईने उत्तर दिले की, ‘कुणी नाही. कुणावरही विश्वास ठेवू नका.’ तिच्या आईने डोळे उघडे ठेवून खेळण्याचा सल्ला दिला आहे. हे वाचा- अन् अमृता-प्राजक्तामध्ये रंगणार कधी न पाहिलेला ऐकलेला सवाल जवाब, पाहायला मिळणार जबरदस्त जुगलबंदी! अंजलीला का बसला धक्का? जेव्हा मुनव्वर अंजलीच्या आईला भेटायला आला तेव्हा अंजलीच्या आईने त्याला सांगितले की तो चांगला आहे आणि ते दोघे मित्र म्हणून चांगले आहेत. मात्र, तो गेल्यावर त्या अंजलीला म्हणाल्या की, ‘त्याच्यापासून थोडं लांब राहा. तुझी सगळी मतं त्याला जात आहेत.’ हे ऐकून अंजलीला धक्का बसला. तिने अंजलीला असेही सांगितले की जेव्हा तिने मुनव्वरला ‘आय लव्ह यू’ म्हटले होते, तेव्हा ते व्हिडीओ देखील बाहेर आले आहेत.

अंजलीच्या बॉयफ्रेंडचा मेसेज आई आल्यानंतर अंजली खूप भावुक झालेली असते आणि त्यावेळी ती तिच्या बॉयफ्रेंडबद्दल विचारते. अंजलीने आईला विचारले आकाश कसा आहे? यावर तिची आई म्हणाली की मिस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या