bharti singh
मुंबई, 10 मार्च- भारती सिंग आज टीव्ही जगतातील मोठं नाव आहे, तिची वेगळी ओळख करून द्यायचा गरज नाही. ती नेहमीच तिच्या कॉमेडीनं प्रेक्षकांचे मन जिंकते.टीव्ही ते सोशल मीडिया सगळीकडे तिच्या कॉमेडीचा जलवा पाहायला मिळतो. प्रेक्षकांचे ती नेहमीच मनोरंजन करताना दिसते. तिच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज आहे. भारतीला करण जोहरचा मोठा सिनेमा मिळाला आहे. भारती सिंगनं नुकतीच पिंकविलाला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं एक गुडन्यूज शेअर केली. तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली. लवकरच भारती तिचा नवरा हर्ष लिंबाचिया याच्यासोबत करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात दिसणार असल्याचे सांगितलं. या सिनेमात हे कपल कैमियो म्हणजे पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावताना दिसणार आहेत. वाचा- ‘या’ अभिनेत्रीचं तीन मुलांच्या बापासोबत लग्न; चौथ्यांदा बोहोल्यावर चढला अभिनेता अचानक मिळाला रोल भारती सिंग या मुलाखतीत म्हणाली की, अचानक एके दिवशी मला करण जोहरच्या टीमचा फोन आला. त्यांनी सांगितलं की, सिनेमात एक जाहिरात आहे त्यामध्ये तिला आणि हर्षला काम करायचे आहे. भारती पुढे म्हणाली की, माझ्य़ासोबत ‘कुंडली भाग्य’ मालिकेतील अभिनेत्री श्रद्धा आर्या देखील होती. करण जोहरसोबत काम करायला मला देखील आवडलं. वाचा- गौतमी पाटीलला मिळाली मराठीतील ‘या’अभिनेत्याची साथ;चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज जुलैमध्ये होणार सिनेमा प्रदर्शित करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमाच्या प्रदर्शनाची अतुरता प्रेक्षकांना लागली आहे. या सिनेमात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट दिसणार आहेत. या दोघांचा ‘गली बॉय’ हा सिनेमा सुपरहीट झाला होता. आता त्यांच्या या नवीन सिनेमासाठी आणि या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनामाच्या निमित्ताने करण जोहर खूप काळानंतर दिग्दर्शन करताना दिसत आहे. या सिनेमात धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबानी आजमी यासारखे कलाकार दिसणार आहेत.