गौतमी पाटील आणि वाद हे समीकरणच बनलंय कि काय असा अनेकांना प्रश्न पडतो. दरम्यान गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गौतमीच्या कलेला आता बिग बॉस मराठी फेम अभिनेता उत्कर्ष शिंदेची साथ मिळणार आहे. उत्कर्षच्या नव्या गाण्यांमध्ये गौतमीला झळकण्याची संधी मिळाली आहे. उत्कर्ष शिंदेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. उत्कर्षने पोस्ट करत लिहलंय, '"अहो शेट लय दिसान झालीया भेट " ह्या माझ्या संगीतबद्ध केलेल्या सुपरहिट लावणी नंतर ह्यावर्षी लवकरच तुम्हा सर्वांसाठी . ''माझ नवं लिखाण नवं संगीत नव्या गायके सोबत खूप साऱ्या नवीन लावण्या घेऊन येणार .लवकरच'' . उत्कर्ष आणि गौतमीच्या नव्या प्रोजेक्टससाठी चाहते उत्सुक आहेत.