मुंबई 27 मे**:** किम कर्दशियन (Kim Kardashian) हिला हॉलिवूडची राखी सावंत असं म्हटलं जातं. ती देखील राखीप्रमाणेच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळं अधिक चर्चेत असते. वादग्रस्त वक्तव्य करणं, चित्रविचित्र पोशाख परिधान करणं, राजकीय नेत्यांवर आरोप करणं यामुळं अनेकदा ती चर्चेत असते. या अती व्यक्त होण्याच्या प्रवृत्तीमुळं अनेकदा तिच्याविरोधात कायदेशीर तक्रारी देखील करण्यात आल्या आहेत. (Kim Kardashian troll) यावेळी देखील तिनं असंच काहीसं करुन एक नवा वाद अंगावर ओढून घेतला आहे. किमनं नुकतंच एका फॅशन मॅगझिनसाठी फोटोशूट केलं. यामधील काही फोटो तिनं सोशल मीडियावर देखील शेअर केले. या फोटोमध्ये तिनं गुलाबी आणि लाल रंगाचा एक ग्लॅमरस ड्रेस परिधान केला आहे. परंतु प्रेक्षकांचं लक्ष तिच्या ड्रेस ऐवजी कानातील इअर रिंग्सनं वेधून घेतलं. तिनं चक्क ओम असं चिन्ह असलेल्या इअर रिग्स घातल्या आहेत. (Kim Kardashian Slammed for Wearing Om Earrings) तिच्या या कृतीमुळं भारतीय नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत सध्या ता जोरजार ट्रोल केलं जात आहे. Video: भर लग्नात दिव्या चोपणार ‘देवीसिंग’ला; देवमाणूसमध्ये आला सर्वात मोठा ट्विस्ट
किमनं या ट्रोलिंगवर अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु यापूर्वी देखील तिनं असेच काहीसे प्रताप करुन भारतीय नेटकऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षी तिनं मांग टिका आणि हातात सोन्याच्या बांगड्या घालून फोटोशूट केलं होतं. त्यावेळी देखील तिला ट्रोल करण्यात आलं होतं.