मुंबई 27 मे**:** चांगुलपणाचा बुरखा पांगरुन लोकांना फसवणाऱ्या व स्त्रियांचं शोषण करणाऱ्या प्रवृत्तीचे लोक काही कमी नाहीत. अशाच प्रवृत्तीवर भाष्य करणारी ‘देवमाणूस’ (Devmanus) ही मालिका सध्या अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेली ही मर्डर मिस्ट्री आता लवकरच उलगडणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मालिकेतील देवी सिंग अर्थात खलनायकाला भर लग्नात पोलीस बेड्या ठोकणार आहेत. (Devmanus serial twist) या भागाचा प्रोमो नुकताच झी मराठीनं (Zee Marathi) सोशल मीडियावर शेअर केला आहे. डॉक्टरचा वेश पांघरुन गावातील लोकांना फसवणारा देवी सिंग डिंपलसोबत लग्नगाठ बांधण्याची तयारी करत असतो. तर दुसरीकडे एसीपी दिव्या त्याच्या विरोधात पुरावे शोधतेय. तिनं या गुन्हेगाराला पकडण्यासाठी आजवर अनेकदा जाळं फेकलं. परंतु प्रत्येक वेळी डॉक्टर त्यातून निसटला. वेळप्रसंगी त्यानं लोकांच्या हत्याही केल्या. मात्र त्याचा हा खेळ येत्या 31 मे रोजी संपणार अशी चिन्ह दिसत आहेत. अर्थात प्रदर्शित झालेल्या प्रोमोवरुन तरी तसंच दिसत आहे. यामध्ये भर लग्नात दिव्या देवी सिंगला मारताना दिसत आहे. जगातील सर्वात श्रीमंत पॉपस्टारनं केलं लग्न; लग्नात एकही पाहुणा नव्हता, तरी झाला 100 कोटींचा खर्च
‘देवमाणूस’ या मालिकेतील ‘सरू आजी, डिम्पल, टोण्या, बज्या, विजय,नाम्या, मंजुळा आणि डॉ. अजित कुमार देव’ ही आणि अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत. रंजक आणि रहस्यमयी कथानकामुळं ही मालिका लोकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रत्येक एपिसोडगणिक मालिकेची उत्कंठा वाढत आहे. येत्या काळात मालिका आणखी रंगत जाणार यात शंका नाही. ‘देवमाणूस’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.