JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ketaki chitale: शाई फेकल्यामुळे खराब झालेल्या ब्लाऊजचं केतकी चितळेनं काय केलं पाहा; आता VIDEO होतोय व्हायरल

ketaki chitale: शाई फेकल्यामुळे खराब झालेल्या ब्लाऊजचं केतकी चितळेनं काय केलं पाहा; आता VIDEO होतोय व्हायरल

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विरोधात लिहिलेल्या फेसबुक पोस्टमुळे ती अटक झालेली अभिनेत्री केतकी चितळेने परत एकदा सोशल मीडियावरून एक पोस्ट केली आहे. झालेल्या अपमानाला तिने वेगळ्या पद्धतीने उत्तर दिले आहे. हे बघून चाहत्यांकडून तिचं कौतुक होतंय.

जाहिरात

ketaki chitale

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 ऑगस्ट : मराठी अभिनेत्री केतकी चितळे मध्यतंरी अनेक कारणांमुळे चर्चेत आली. ती आतापर्यंत अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अलीकडेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विरोधात लिहिलेल्या फेसबुक पोस्टमुळे ती अडचणीत सापडली होती. शरद पवार यांच्याविषयी तिने अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. पण अटकेदरम्यान तिला कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. यावेळी तिच्यावर शाई फेकली गेली होती. त्यावेळी तिच्या ब्लाउजवर शाईचे डाग पडले होते.  खरेतर शाईफेक करण्यामागे तिचा अपमान करण्याचा उद्देश होता पण या अभिनेत्रीने आता ब्लॉउजचं स्वरूप बदलून टाकत तेच ब्लाउज अभिमानाने घातले आहे. केतकीने काही आंदोलकांनी घाण केलेल्या तिच्या ब्लाउजला एक मजेदार ट्विस्ट दिला आहे. केतकीला पोलिस घेऊन जात असताना, काही आंदोलकांनी तिच्यावर शाई फेकली होती आणि तिचा ब्लाउज आणि साडी खराब झाली होती, त्यानंतर अभिनेत्रीने ब्लाउजवर नवीन पेंटिंग करत त्यावरील शाईच्या डागांना पद्धतशीरपणे लपवलं आहे. तिच्या या कृतीचं  चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या

केतकीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ब्लाऊज रंगवताना दिसत आहे. जेव्हा शाईफेक करण्यात आली तेव्हाचे काही फोटो व्हिडीओच्या सुरुवातीला दिसत आहेत. त्यानंतर शाईमुळे खराब झालेला ब्लाऊज ती सगळ्यांना दाखवत आहे. केतकीने मोठ्या हुशारीने ब्लाउजवर डिझाईन काढली आहे. तिने ब्लाउजवर ज्या ज्या ठिकाणी शाईचे डाग पडले आहेत त्या ठिकाणी चक्क त्रिशूळ  काढले आहेत. हेही वाचा - Siddharth chandekar Mitali mayekar : सिद्धार्थला पाहताच मितालीनं एअरपोर्टवर केलं असं काही; फोटो व्हायरल केतकीने सोशल मीडियावरून हा व्हिडीओ  शेअर करताना “हर हर महादेव” असं असं कॅप्शन दिलं  आहे. केतकीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी केतकीच्या कलेचं कौतुक केलं आहे तर काहींनी तिच्या साहसाचं  कौतुक केलं आहे. चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर ‘आम्हाला तुझा अभिमान वाटतो’,  ‘खूपच सुंदर’, ‘तुझ्या हिमतीला सलाम’, ‘तू अगदी हुशार आणि हिंमतीनं प्रसंगांना सामोरं जाणारी मुलगी आहेस’, ‘तुला अधिक बळ मिळो’  अशा शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. केतकी जवळपास महिनाभर कारागृहात होती. अटकेदरम्यानसुद्धा ती हसत होती. तिने लिहिलेल्या पोस्टमुळे अनेकांनी तिचं  कौतुक केलं होतं  तिच्याविरुद्ध पण तिच्याविरुद्ध टीका,  आंदोलने देखील करण्यात आली होती.   केतकी कारागृहातून जेव्हा बाहेर आली तेव्हा तिनं ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली होती. केतकीनं तिच्या झालेल्या अपमानाचा बदला अशा वेगळ्या पद्धतीने घेतल्यामुळे सोशल मीडियावर तिचं कौतुक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या