मुंबई, 22 जानेवारी- बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) नुकतेच सरोगेसीच्या आधारे आईबाबा बनले आहेत. प्रियांकाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुड न्यूज दिली आहे. ही गोड बातमी शेअर करत तिनं चाहत्यांना आणि माध्यमांना प्रायव्हशी देण्याची विनंती केली आहे. कारण तिला तिच्या कुटुंबवार यावेळी लक्ष द्यायचे आहे. ही गोड बातमी ऐकून चाहते खुश झाले आहेत. शिवाय बॉलवूडकरांनी देखील तिचं अभिनंदन केलं आहे. फरहान अख्तर, कतरिना कैफ व नेहम धुपिया या सेलेब्सने तिचं अभिनंदन करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. प्रियांका चोप्राने आणि निक जोनसने इन्स्टाग्राम पोस्टवरून आपल्या घरात सरोगेसीद्वारे बाळाचं आगमन झाल्याचं सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ही बातमी आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायला खूप आनंद होत आहे आम्हच्या घरात सरोगेसीद्वारे बाळाचं आगमन झालं आहे. या खास आणि आनंदाच्या वेळी आम्ही प्रायव्हशीची तुमच्याकडे विनंती करतो असं देखील त्यांनी म्हटलं आहे. वाचा- 12 आठवड्यांआधीच जन्माला आली प्रियांकाची लेक, अजूनही हॉस्पिटलमध्येच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली गुड न्यूज निकने त्याच्या इन्स्टावरून ही बातमी शेअर केली आहे. या कपलने जशी ही बातमी शेअर केली तशी चाहत्यांसह त्यांच्या दोस्त मंडळीने देखील कमेंट सेक्शनमध्ये शुभेच्छांचा वर्षाव केला. निकचा भाऊ केविन जोनास याने या दोघांच्या पोस्टवर हार्टची इमोजी शेअर केली आहे. वाचा ‘गहराइयाँ’मध्ये सिद्धांतसह इंटिमेट सीन करणं दीपिकाला गेलं सोपं, हे सांगितलं कारण प्रियांकाच्या मित्र मंडळीकडून शुभेच्छांचा वर्षाव लारा दत्तने म्हटलं आहे ती, अभिनंदन ! तर पूजा हेगडे देखील अभिनंदन ! आणि खूप प्रेम, असं म्हटलं आहे. प्रियांकाची जवळची मैत्रिण कॉमेडियन लिली सिंहने म्हटलं आहे की, गळभेट घेण्याची वाट पाहू शकत नही. कालपेनने म्हटले आहे की, अभिनंदन! कालपेन काका बेबीशिटसाठी तयार आहे.
प्रियांकाच्या काही मित्र मंडळीकडून आश्चर्य व्यक्त मिनी माथुरने म्हटलं आहे की, अभिनंदन ! प्रियांका आणि निका, ही खर तर आश्चर्यचकीत करणारी बातमी आहे. तसेच फरहान अख्तरने म्हटले आहे की, निकला आणि तुझं अभिनंदन ! नेहा धूपियाने म्हटलं आहे की, अभिनंदन निक आणि प्रियांका. आतापर्यंतची सगळ्याच गोड बातमी.