जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 12 आठवड्यांआधीच जन्माला आली प्रियांका चोप्राची लेक, आणखी काही दिवस राहणार हॉस्पिटलमध्येच

12 आठवड्यांआधीच जन्माला आली प्रियांका चोप्राची लेक, आणखी काही दिवस राहणार हॉस्पिटलमध्येच

12 आठवड्यांआधीच जन्माला आली प्रियांका चोप्राची लेक, आणखी काही दिवस राहणार हॉस्पिटलमध्येच

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) नुकताच सरोगेसीच्या आधारे आईबाबा बनले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 जानेवारी-   अभिनेत्री प्रियांका चोप्रा   (Priyanka Chopra)  आणि निक जोनस   (Nick Jonas)   नुकताच सरोगेसीच्या आधारे आईबाबा बनले आहेत. अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुड न्यूज दिली होती. परंतु आता समोर आलेल्या नव्या माहितीनुसार, अभिनेत्रीची मुलगी   (Priyanka Chopra Daughter)  काही आठवडे आधीच जन्माला आली आहे. प्रिमॅच्युअर असल्याने बाळाला अजूनही हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आल्याचं समोर आलं आहे. प्रियांका चोप्राने काल इन्स्टाग्राम पोस्टवरून आपल्या घरात सरोगेसीद्वारे बाळाचं आगमन झाल्याचं सांगितलं होतं. परंतु आपल्या घरात छोटा पाहुणा आला ली पाहुनी याचा खुलासा अभिनेत्रीने केलेला नव्हता. परंतु US विकलीच्या रिपोर्टनुसार अभिनेत्री आता लेकीची आई झाल्याचं म्हटलं आहे. तर टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार प्रियांका आणि निकची मुलगी डॉक्टर्सनी दिलेल्या तारखेच्या तब्बल १२ आठवडे आधीच जन्माला आली आहे. त्यामुळे ती अजूनही प्रिमॅच्युअर आहे. आणि म्हणूच बाळाला अजूनही काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. प्रियांका चोप्रा पोस्ट- बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबतची गुड न्यूज शेअर केली होती. प्रियांकाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ‘आम्ही सरोगसीद्वारे बाळाचे स्वागत केले आहे. याबाबतची बातमी देताना आम्हाला खूप आनंद होतोय. या आनंदाच्या आणि विशेष क्षणात आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रीत करत आहोत’. या पोस्टनंतर अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जाहिरात

निक आणि प्रियांकाला याआधी अनेकदा बाळाच्या आगमनाबाबत जाहिरपणे प्रश्नही विचारण्यात आले होते. दोघेही या प्रश्नांना टाळताना दिसत होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्वत: प्रियांकानं आपल्या फॅमिली प्लॅनिंगबाबत (Priyanka Chopra Family Planning) भाष्य केलं होतं. ‘निक आणि माझ्या मॅरिड लाईफमध्ये बेबीला (Baby) महत्त्वाचं स्थान आहे. भविष्याचा विचार करून आम्ही दोघांनी प्लॅनिंग केलेलं आहे’, अशी प्रतिक्रिया प्रियांकानं दिली होती. एका मुलाखतीदरम्यान दिलेल्या प्रतिक्रियेतून तिनं आई होण्याची इच्छा व्यक्ती केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात