JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अगं बाई अरेच्चा! 'ही' तर 'कतरिना कैफ'ची कार्बन कॉपीच, सलमान खानदेखील फसेल

अगं बाई अरेच्चा! 'ही' तर 'कतरिना कैफ'ची कार्बन कॉपीच, सलमान खानदेखील फसेल

सध्या सोशल मीडियावर हुबेहूब कतरिना कैफसारख्या दिसणाऱ्या एका मुलीचे फोटो व्हायरल होत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 सप्टेंबर : हुबेहूब बॉलिवूड कलाकारांसारखी दिसणारी दुसरी व्यक्ती सापडणं आता काही नवी गोष्ट नाही. आतापर्यंत सलमान खान, सैफ अली खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, अनुष्का शर्मा यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्ती सापडल्या आहेत. पण आता या यादी अभिनेत्री कतरिना कैफचाही समावेश झाला आहे. नुकतीच कतरिना सारखी दिसणारी एक मुलगी सापडली असून सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही मुलगी अलीना राय आहे. अलीनाचं सोशल मीडिया अकाउंट पाहिल्यास ती हुबेहूब कतरिना कैफ सारखीच दिसत आहे. तिच्या आणि कतरिनाच्या चेहऱ्यात एवढं साम्य आहे की सलमान खान सुद्धा तिचे फोटो पाहून फसेल. सध्या अलीनाचीच चर्चा सोशल मीडियावर जास्त होत आहे. जेव्हा ओक्साबोक्शी रडत प्रियांका चोप्रा म्हणाली होती, ‘मला माफ करा’ फॅशन ब्लॉगर असलेल्या अलीनाचे इनस्टाग्रामवर 32 हाजाराहून जास्त फॉलोअर्स आहेत. सध्या सोशल मीडियावर कतरिना आणि अलीना यांच्या फोटोंचे कोलाज व्हायरल होत आहेत. त्यामुळे अलीना अचानक सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अलीनाच्या बहुतेक फोटोंवरील कमेंटमध्ये युजर्सनी तिला ‘सिंग इज किंग वाली कतरिना’ अशी कमेंट केली आहे. याशिवाय कतरिनाच्या अनेक चाहत्यानी अलीनाच्या फोटोंवर कमेंट केली आहे. रानू मंडल यांच्या दुसऱ्या गाण्याचा रिलीजपूर्वी सोशल मीडियावर ‘जाळ अन् धुरळा’

एका युजरनं लिहिलं, ‘तु हुबेहूब कतरिनासारखीच दिसतेस’ तर काही लोकांनी तर चक्क हे फोटो सलमान खान पर्यंत पोहोचवायला हवेत असं म्हणताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलं, सलमान खान तु हा फोटो पाहायला हवा. अलीनाच्या फोटोंचं सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत. मात्र काही युजर्सना अलीनाच्या या फोटोंवर विश्वास नाही त्यामुळे ते तिला हा तुझाच फोटो आहे का? कतरिनाची परफेक्ट कॉपी कशी असू शकते? असं विचारताना दिसत आहेत. जावेद अख्तर नाही, ‘हा’ बॉलिवूडचा अभिनेता हाेता शबाना आझमींचा पहिला क्रश

कतरिनाच्याबद्दल बोलायचं तर तिने अद्याप अलीनाचे फोटो पाहिलेले नाहीत. त्यामुळे सर्वांनाच कतरिना हे फोटो पाहिल्यावर काय प्रतिक्रिया देणार याविषयी उत्सुकता आहे. सध्या कतरिना ‘सूर्यवंशी’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. यासिनेमात ती अक्षय कुमार सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. गुरू-राधिकानं स्वीकारलं समर-सुमीचं चॅलेंज, कलाकारांची अशी ‘ही’ लगीनघाई ======================================================= अपघातात फोटो काढणाऱ्या तरुणाला बोनटवर घेऊन पळाला आरोपी, पाहा VIRAL VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या