JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कार्तिकने स्टेजवर सर्वांसमक्ष कतरिनाचे पाय धरले; VIDEO पाहून समजेल कारण

कार्तिकने स्टेजवर सर्वांसमक्ष कतरिनाचे पाय धरले; VIDEO पाहून समजेल कारण

स्टेजवर येताच कतरिनाने अशी काही घोषणा केली की, कार्तिकला तिचे पाय धरावे लागले. सोशल मीडियावर हा VIDEO व्हायरल झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 मार्च : IIFA अवॉर्डच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी आजच्या काळचा तरुण स्टार कार्तिक आर्यन आणि कतरिना कैफ हजर होते. कार्तिकचा हात मोडल्यामुळे एक छोटी सर्जरी करून थेट तो इव्हेंटला हजर झाला. स्टेजवर येताच कतरिनाने अशी काही घोषणा केली की, कार्तिकला तिचे पाय धरावे लागले. सोशल मीडियावर हा VIDEO व्हायरल झाला आहे. प्रेस कॉन्फरन्स इव्हेंटसाठी कार्तिकला पोहोचायला उशीर झाला. स्टेजवर कतरिना आणि कार्तिकला बोलावल्यावर पहिल्यांदा माइक हातात घेऊन कतरिनाने चक्क घोषणाच करून टाकली, “आपण पुढे कार्यक्रम सुरू करण्याआधी कार्तिकला तुमची क्षमा मागायची आहे. कारण त्याला इथे पोहोचायला उशीर झाला.”  कार्तिकनेही कतरिनाचा टाँट खेळकरपणे घेत स्टेजवर चक्क कतरिनाचे पाय धरले आणि वर उठाबशाही काढू लागला.

“काही दिवसांपूर्वी सूर्यवंशीच्या ट्रेलर लाँचला रणवीर सिंह उशीरा पोहोचला होता. तेव्हा ज्या पद्धतीने माफी मागितली. मी तेच करणार आहे”, असं म्हणून कार्तिकने कतरिनाचे पाय धरले. रणवीर सिंहनेही व्यासपीठावरच्या साऱ्यांची माफी मागत पाय धरले होते. सूर्यवंशी या सिनेमात कतरिनाची प्रमुख भूमिका आहे, हे विशेष. पाहा - दिल्ली हिंसाचारावर रितेश देशमुखचा TikTok Video, असं काही म्हणाला की… त्यानंतर कतरिना आणि लव-आज कल चा हीरो कार्तिन आर्यन यांनी कार्यक्रम गाजवला. हात बांधलेला असूनदेखील कार्तिकने धमाल डान्स स्टेप्स केल्या.

अन्य बातम्या ओळखलं का कोण ते? ‘बिग बीं’नी शेअर केला जगासमोर कधीही आला नाही असा फोटो ‘…तर आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या