JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Finally! करीनाच्या दुसऱ्या मुलाचा फोटो आला समोर; फॅन्स म्हणतात ''हा तर...''

Finally! करीनाच्या दुसऱ्या मुलाचा फोटो आला समोर; फॅन्स म्हणतात ''हा तर...''

करीनाच्या दुसऱ्या मुलाचा फोटो समोर आल्याने सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 15 जुलै : अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सध्या तिच्या नव्या पुस्तकामुळे फारच चर्चेत आहे. करीनाने नुकतच तिचं ‘प्रेगनन्सी बायबल’ (Kareena Kapoor Khan’s pregnancy Bible)  हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. पण या पुस्तकामुळे काही विवाद समोर आले आहेत. तर करीना विरोधात एका ठिकाणी गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. तर आता करीनाच्या मुलाचा फोटो समोर आल्याने सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. दरम्यान करीनाच्या एका फॅन पेजने हा फोटो शेअर केला आहे ज्यात करीना तिच्या मुलासोबत खेळताना दिसत आहे. एक फोटो करीनाचा मोठा मुलगा तैमुर सोबत तर दुसरा मुलगा जेह (Jeh) सोबत. अनेकांनी हा सेम टू सेम तैमुर दिसत असल्याचंही म्हटलं. (Kareena Kapoor’s baby)

काही दिवसांपूर्वीच करीनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव समोर आलं होत. तिने त्याचं नाव जेह असं ठेवलं आहे. तर करीनाने जेहच्या जन्मापासूनच त्या मिडियापासून दूर ठेवलं आहे. तर त्याचा कोणता फोटोही समोर आला नव्हता. पण जर या फॅन पेजचा दावा खरा असेल तर करीना आणि जेहचा हा पहिला फोटो सोशल मीडियावर आला आहे.

संबंधित बातम्या

तैमुरच्या मीडियातील प्रचंड वावरानंतर करीनाने दुसऱ्या मुलाला यासगळयापासून दूरच ठेवलं आहे. तर आपल्या गर्भवती पणातील सगळ्या क्षणाचं तिने तिच्या पुस्तकात वर्णन केलं आहे.

अक्षय कुमारची मेव्हणी ते काजोलच्या बहिणीपर्यंत… हे Star Kids ठरले सुपरफ्लॉप; बॉलिवूडमधून आहेत गायब

पण या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. काही अल्पसंख्यांक समाजातील व्यक्तींनी या पुस्कावर बंदी घालण्यासाठी केस नोंदवण्याचाही निर्णय घेतला आहे.  याशिवाय एका ठिकाणी गुन्हा दाखल झाल्याचं ही वृत्त समोर आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या