JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सुपरस्टार होती करीना-करिश्माची आई; लग्नानंतर करिअर सोडलं अन् मिळाला धोका; 35 वर्ष राहिली नवऱ्यापासून दूर

सुपरस्टार होती करीना-करिश्माची आई; लग्नानंतर करिअर सोडलं अन् मिळाला धोका; 35 वर्ष राहिली नवऱ्यापासून दूर

अभिनेत्री बबिता हिने तिसर्‍याच चित्रपटात स्टारचा दर्जा मिळवला होता. बबिता नंतर बॉलीवूडच्या सर्वात यशस्वी चित्रपट कुटुंबाची, कपूर घराण्याची सून बनली आणि तिच्या कारकिर्दीला ब्रेक लागला.

जाहिरात

बबिता कपूरच्या दोन्ही मुली करीना आणि करिश्मा कपूर सुपरस्टार आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जून:   ‘हम तो तेरे आशिक है सदियो पुराने…’ आजही हे गाणं पाहिलं तर मन प्रसन्न होते. या गाण्यात सुपरस्टार जितेंद्रसोबत अतिशय सुंदर नायिका बबिता झळकली होती. त्यानंतर ती लाखो हृदयांची राणी बनली होती. अभिनेत्री बबिता हिने तिसर्‍याच चित्रपटात स्टारचा दर्जा मिळवला होता. बबिता नंतर बॉलीवूडच्या सर्वात यशस्वी चित्रपट कुटुंबाची, कपूर घराण्याची सून बनली. इतकेच नाही बबिता कपूरच्या दोन्ही मुली करीना आणि करिश्मा कपूर सुपरस्टार आहेत. बबिता कपूर जितकी सुंदर आणि हुशार अभिनेत्री आहे, तितकंच दुःख मात्र तिच्या वाट्याला आलं आहे.  कारकिर्दीच्या शिखरावर असताना, ज्या प्रेमासाठी बबिताने यशस्वी कारकिर्दीला रामराम ठोकला, त्याच प्रेमाने बबिताला दगा दिला. लग्नानंतर जवळपास 35 वर्षे पतीपासून दूर राहिलेल्या बबिता यांनी वयाच्या शेवटच्या टप्प्यात पतीला माफ केले आणि दोघे पुन्हा एकत्र राहू लागले.

आपल्या काळातील सुंदर अभिनेत्री  बबिताचा जन्म 20 एप्रिल 1947 रोजी मुंबईतील एका सिंधी कुटुंबात झाला. बबिता शिवदासानीचे वडील हरी शिवदासानी यांनीही चित्रपटांमध्ये काम केले आणि ते चरित्र कलाकार म्हणून काम करायचे. बबिताची चुलत बहीण साधना शिवदासानी देखील अभिनेत्री होती. बहिणीप्रमाणे चित्रपटात दिसण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बबिताने 1967 साली राज या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. Rambha : सलमानच्या ‘या’ अभिनेत्रीनं केलेला जीव द्यायचा प्रयत्न? जाणून घ्या ‘त्या’ अफवेमागचं सत्य मात्र, याआधी बबिता दस लाख या चित्रपटातही दिसली होती. नायिका म्हणून राजचा पहिला चित्रपट भलेही हिट झाला नसेल, पण बबिताच्या अभिनयाने लोकांच्या मनावर छाप सोडली. यानंतर 1967 मध्ये जितेंद्रसोबत बबिताचा फर्ज हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट त्याच्या करिअरसाठी मैलाचा दगड ठरला. या चित्रपटात बबिता आणि जीतेंद्रची जोडी हिट ठरली आणि बबिता स्टार झाली. यानंतर बबिताने एकामागून एक अनेक हिट चित्रपट दिले. बबिताने तिच्या करिअरमध्ये 24 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. अवघ्या 6 वर्षांच्या कारकिर्दीत बबिताने 19 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि खूप नाव कमावले. पण 70 च्या दशकात बबिताची भेट बॉलिवूड सुपरस्टार राज कपूर यांचा मुलगा रणधीर कपूरशी झाली. दोघे प्रेमात पडले आणि 6 नोव्हेंबर 1971 रोजी लग्न झाले. लग्नाच्या 4 वर्षानंतर करिश्मा कपूरचा जन्म झाला. काही वर्षांनंतर 1980 मध्ये बबिता आणि रणधीरच्या पोटी करीना कपूरचा जन्म झाला. करिनाच्या जन्मानंतर बबिता आणि रणधीर यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. बबिता रणधीरचे घर सोडून निघून गेली. बबिताने रणधीरला घटस्फोट दिला नव्हता. 35 वर्षांच्या भांडणानंतर रणधीर आणि बबिता एक झाले आणि पतीला माफ करून बबिता त्याच्यासोबत राहू लागली. आज बबिता पती रणधीरसोबत मुंबईत राहते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या