advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Rambha : सलमानच्या 'या' अभिनेत्रीनं केलेला जीव द्यायचा प्रयत्न? जाणून घ्या 'त्या' अफवेमागचं सत्य

Rambha : सलमानच्या 'या' अभिनेत्रीनं केलेला जीव द्यायचा प्रयत्न? जाणून घ्या 'त्या' अफवेमागचं सत्य

सलमान खानबरोबर 'जुडवा' चित्रपटामध्ये काम केलेली ती एके काळी आघाडीची अभिनेत्री होती. 1990 आणि 2000च्या सुरुवातीच्या काळात तिने अनेक बॉलिवूड व दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं. दोन दशकांच्या करिअरमध्ये तिने बंगाली, भोजपुरी, इंग्रजी, हिंदी, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली. तिने आठ भाषांमधल्या 100हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला; मात्र, सध्या ती चित्रपटांपासून दूर आहे. तिचं नाव रंभा. रंभाने चित्रपटसृष्टी का सोडली, सध्या ती कुठे आहे व काय करते, याबद्दल जाणून घेऊ या.

  • -MIN READ | Trending Desk Mumbai,Maharashtra
01
 'मेरा कंगना झांझर चूड़ी खनखन करती है' या लोकप्रिय गाण्यातली अभिनेत्री तुम्हाला आठवतेय का? 2000मधल्या या गाण्यातली अभिनेत्री रंभा आता चित्रपटसृष्टीत सक्रिय नाही.

02
 रंभाने आपल्या करिअरची सुरुवात 'आ ओक्कटी अडक्कू' या चित्रपटातून केली. त्यानंतर तिने अनेक तमिळ-तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं. तिने 1995मध्ये 'जल्लाद' या चित्रपटातून हिंदीत पदार्पण केलं. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती होते. हा चित्रपट फ्लॉप झाला होता.

03
 'जल्लाद'नंतर तिने 'कहर', 'जंग', 'जुडवा', 'दानवीर', 'जुर्माना' अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. 'जुडवा'मध्ये रंभा सलमान खानसोबत दिसली होती; पण ती प्रेक्षकांवर प्रभाव टाकू शकली नाही.

04
 रंभाने गोविंदासोबत 'क्यूंकी मैं झूठ नहीं बोलता' आणि 'बेटी नंबर 1'मध्ये काम केलं. तो चित्रपट हिट झाला होता. तिने अनिल कपूर, सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्यासोबतही चित्रपट केले आहेत.

05
रंभाने तिच्या करिअरमध्ये डझनभर फ्लॉप चित्रपट दिले आणि लग्नानंतर ती चित्रपटांपासून दूर गेली.

06
 रंभाने 2010मध्ये श्रीलंकन बिझनेसमन इंद्रन पद्मनाथन यांच्याशी लग्न केलं आणि ती टोरांटोमध्ये स्थायिक झाली. यामुळे तिचं फिल्मी करिअर पूर्णपणे संपलं. त्याच वर्षी 'पेन सिंगम'मध्ये ती छोट्या भूमिकेत दिसली होती; पण नंतर ती पुन्हा पडद्यावर दिसली नाही. सलमान खानसोबत 'बंधन' आणि 'जुडवा'मध्ये काम केलेली रंभा 2016मध्ये पतीपासून घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या आल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती चेन्नईच्या फॅमिली कोर्टातही दिसली होती.

07
नंतर रंभाने या सर्व चर्चा खोडून काढल्या व संसारात आनंदी असल्याचं सांगितलं. रंभा परदेशात राहते. मुलं व पतीसोबतचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. एकदा तिच्या आत्महत्येच्या बातम्याही आल्या होत्या; पण त्याही अफवा होत्या.

08
सलमान खान 57व्या वर्षीही सिंगल आहे, तर रंभा तीन मुलांची आई आहे.

  • FIRST PUBLISHED :
  •  'मेरा कंगना झांझर चूड़ी खनखन करती है' या लोकप्रिय गाण्यातली अभिनेत्री तुम्हाला आठवतेय का? 2000मधल्या या गाण्यातली अभिनेत्री रंभा आता चित्रपटसृष्टीत सक्रिय नाही.

    MORE
    GALLERIES